Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात काँगे्रस खासदार धीरज साहू विरोधात आंदोलन

अकोले ः झारखंड राज्यातील राज्यसभेतील संसद खासदार धीरज साहू यांच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ अकोले बसस्थानक परिसरात  अकोले तालुका भारतीय जनता पार

महापालिकेत पसरला आनंदोत्सव…132 जणांना पदोन्नती
बंदिस्त नाटयगृहापासून वंचित ठेवण्याचे काम आमदारांनी केले : कोल्हे
पञकार संघाच्या वतीने कोपरगाव येथे कोविड योध्दा रक्तदान शिबीर

अकोले ः झारखंड राज्यातील राज्यसभेतील संसद खासदार धीरज साहू यांच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ अकोले बसस्थानक परिसरात  अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या सोमवारी सकाळी 11:30 वाजता माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार साहू यांच्या प्रतिमेला चपला मारून नंतर पुतळ्याचे दहन केले. यावेळी खासदार धीरज साहू यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या विरोधात घोषणा देऊन अकोले बसस्थानक परिसर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुमदुमून टाकला होता. यावेळी जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे,भाजप तालुका अध्यक्ष यशवंतराव आभाळे, ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, अमृतसागर दूध संघांचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, माजी नगरध्यक्ष सोनाली नाईकवाडी, तालुका सरचिटणीस राहुल देशमुख, सचिन जोशी, मच्छिन्द्र मंडलिक, मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, प्रकाश नवले, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उप नगराध्यक्ष शरद नवले, भाजपा महिला तालुकाध्यक्ष वैशाली जाधव, कैलास जाधव, जिल्हा सदस्य संदीपराव शेटे, भाऊसाहेब खरात, आनंदराव वाकचौरे, रोहिदास धुमाळ, शिवाजी आरज, बबलू धुमाळ, विजय पवार, विकास देशमुख,सागर चौधरी, भाऊसाहेब औटी, धनंजय संत, सुनील कोटकर, दत्ता ताजणे, प्रकाश पाचपुते, सागर चासकर, आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS