Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाचनाने मिळते जीवनाला योग्य दिशा-रवींद्र मालुंजकर 

 नाशिक:- ग्रंथ हे फक्त गुरू नाहीत तर आपल्या प्रत्येकाच्या जवळचे मित्र आहेत. वाचनाने व्यक्ती सुसंस्कृत होत असते. संकटात वाचनच आपल्याला वाचवते. म्ह

पुजेसाठी अगरबत्ती पेटवली असता गॅस सिलेंडर झाला स्फोट.
पुण्यातून 14 विमानांचे उड्डाणे रद्द
तुम्ही टीका करत राहा , आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे

 नाशिक:- ग्रंथ हे फक्त गुरू नाहीत तर आपल्या प्रत्येकाच्या जवळचे मित्र आहेत. वाचनाने व्यक्ती सुसंस्कृत होत असते. संकटात वाचनच आपल्याला वाचवते. म्हणूनच वाचनाने आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर यांनी केले.

     गांधीनगर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात ग्रंथ सप्ताहानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक लालजी आवारे, पर्यवेक्षक राजेश शिंदे, ग्रंथपाल शोभा मोगल उपस्थित होते. आपल्या व्याख्यानात मालुंजकर पुढे म्हणाले की, नियमितपणे वाचनाची आवड जोपासल्यास आपल्याला नक्कीच फायदा होतो. आजच्या काळात वाचनसंस्कृती कमी होत असल्याने आजच्या पिढीने वाचनाची सवय बाळगावी, असे सांगून विविध आशयसंपन्न कविता सादर करत त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी ग्रंथदिंडीन काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या भूमिकेत सादरीकरण केले. ज्ञानोबा-तुकाराम यांचा गजर केला. ग्रंथपाल शोभा मोगल यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथांचे महत्त्व विशद करून पुस्तके वाचण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक लालजी आवारे यांनीही मोबाईलचा वापर कमी करून बालवयातच आपण छोटछोट्या गोष्टींची पुस्तके वाचून आपल्या ज्ञानात भर घालण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. पर्यवेक्षक राजेश शिंदे सर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पगार यांनी केले .

COMMENTS