Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक शहरात प्रथमच राज्यस्तरीय बालवैज्ञानिक महाकुंभ

नाशिक प्रतिनिधी :-  मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेने आजवर लोकहितवादी आणि प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात  प्रामाणिक काम करण्याचा अजेंडा काय

कर्जत-जामखेडमध्ये ‘मनरेगा’अंतर्गत सर्वाधिक रोजगार :आमदार पवार
…तर उद्याच राजीनामा देतो; बच्चू कडू शेतकऱ्यांवर संतापले |
गणेश भोसने बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये पटकावले ब्राँझपदक

नाशिक प्रतिनिधी :-  मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेने आजवर लोकहितवादी आणि प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात  प्रामाणिक काम करण्याचा अजेंडा कायम ठेवला असून  येत्या ९ आणि १० डिसेंम्बर २३  रोजी  मानवधन संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२३  चे आयोजन करण्यात आले आहेत. ही परिषद भारत सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागांतर्गत भरविली जाते मात्र नाशिक मध्ये प्रथमच या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहेत.

सदर राज्यस्तरीय परिषदे साठी प्रमुख अतिथी म्हणून श्री जलज शर्मा (जिल्हाधिकारी नाशिक),   डॉ.अशीमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक) , डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ), डॉ. संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त नाशिक)  डॉ. सीताराम कोल्हे (सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक) , डॉ. अपूर्वा जाकडी (स्पेस एज्युकेशन नासा), डॉ. अश्विनी कुमार भारद्वाज ( सीईओ बेजॉन देसाई फाउंडेशन), (डॉ. नितीन  बच्छाव ( शिक्षणाधिकारी नाशिक)

तर दुसऱ्या दिवशी सांगता समारंभासाठी प्रा.संजीव सोनवणे , (कुलगुरू वाय.सी.एम.ओ.) , प्रवीण पाटील (शिक्षणाधिकारी माध्यमिक नाशिक), डॉ. कपिल आहेर उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक), मच्छिंद्रनाथ कदम( सचिव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक), डॉ. रवींद्र सपकाळ (अध्यक्ष सपकाळ नॉलेज हब),  डॉ. राजेंद्र कलाल ( कार्याध्यक्ष नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ) , ( ऍड नितीन ठाकरे सरचिटणीस मविप्र समाज) आदि मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेल्या बालवैज्ञानिकांचा वैज्ञानिक महाकुंभ या कार्यक्रमाकरीता धनलक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पाथर्डी फाटा नाशिक येथे आपण आपल्या परिवारासह आनंद द्विगुणित करावा  असे आवाहन निमंत्रक सौ. ज्योती कोल्हे , व डॉ. प्रकाश कोल्हे अनुक्रमे सचिव अध्यक्ष यांनी केले आहेत.

COMMENTS