Homeताज्या बातम्यादेश

इस्त्रो चंद्रावर पाठवणार माणूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

नवी दिल्ली ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चांद्रयान-3 यशस्वी मोहिमेनंतर आता चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी इस्त्रो सज्ज झाली आहे. पंत

ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमिवर पहिले विश्‍वात्मक संत साहित्य संमेलन लांबणीवर
Honda बाइकचं न्यू एडीशन लाँच
जास्त उत्पादन घेण्यात ड्रोनचे योगदान मोलाचे ठरणार : प्रतीक पाटील

नवी दिल्ली ः भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चांद्रयान-3 यशस्वी मोहिमेनंतर आता चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी इस्त्रो सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा भारताच्या भविष्यातील अंतराळातील प्रयत्नांसाठी हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, इस्त्रोचे अभिनंदन, आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत आपण एक मैलाचा दगड गाठला आहे. ज्यामध्ये 2040 पर्यंत एक भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याच्या उद्देशाचा देखील समावेश आहे. इस्त्रोने या ऑपरेशनला एक अनोखा प्रयोग म्हटले आहे. चांद्रयान-3 चा मुख्य उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरवर लावण्यात आलेल्या उपकरणांच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे हा होता. हे अंतराळ यान 14 जुलै 2023 रोजी श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन स्पेस सेंटरहून एलव्हीएम3-एम4 रॉकेटच्या मदतीने लाँच करण्यात आले. चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले होते. इस्त्रोने सांगितले की प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून परत पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्याच्या प्रयोगाच मुख्य फायदा आगामी मोहिमांची योजना तयार करण्यासाठी होईल. खासकरून चंद्रावरून मिशन पृथ्वीवर परत आणण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. चांद्रयान -3 मिशनचे प्रोपल्शन मॉड्यूल 17 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडरपासून वेगळा झाला होता आणि चंद्राच्या भोवती फिरत होता. पहिल्या प्रोपल्शन मॉड्यूलचे आयुष्य 3 ते 6 महिने सांगितली जात आहे. मात्र इस्त्रोने दावा केला आहे की ते अनेक वर्षांपर्यंत काम करू शकते. कारण त्यामध्ये तेवढे इंधन शिल्लक आहे. जेव्हा चांद्रयान -3 चे लाँचिंग झाले होते तेव्हा पोपल्शन मॉड्यूल मध्ये 1696.4 किग्रॅ फ्यूल होते.

COMMENTS