Homeताज्या बातम्यादेश

मिचाँग चक्रीवादळामुळे दक्षिणेतील राज्यात नुकसान

रस्त्यांना नद्याचे स्वरूप शेकडो घरे पाण्याखाली

चेन्नई ः महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, सकाळी असणारे धुके आणि थंडी यामुळे अनेकांचे हाल होतांना दिसून य

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; अल्पवयीन युवक बालसुधारगृहात
अनेक वर्षांचे प्रलंबित विकासाचे एक-एक प्रश्न मार्गी लागत आहे – आ.संग्राम जगताप
स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिनेता नाना पाटेकर यांच्याकडून अभिवादन

चेन्नई ः महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, सकाळी असणारे धुके आणि थंडी यामुळे अनेकांचे हाल होतांना दिसून येत असतांना, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना तडाखा दिला.
चेन्नईत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. झाडे उन्मळून पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा देखील खंडीत आहे. आतापर्यंत या चक्रीवादळाने 17 जणांचा बळी घेतला असून कित्येक लोक जखमी झाले आहे. चक्रीवादळाच्या तडाखा बसलेल्या भागात बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू आहे. चेन्नई आणि त्याच्या उपनगरातील काही भागातील लोकांना अजूनही अस्वच्छ पाणी आणि विजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. चक्रीवादळामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने लाखो हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी तामिळनाडूच्या दौर्‍यावर जाणार आहेत. चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने भीषण पुरामुळे चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू येथील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्ट्या गुरुवारपर्यंत वाढवल्या आहेत. पल्लवरम, तांबरम, वंडलूर, थिरुपुरूर, चेंगलपट्टू आणि थिरुकाझुकुंद्रम येथील शैक्षणिक संस्था शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहेत. पूरस्थितीमुळे चेन्नईतील रहिवाशांना दूध, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्यक्षात पुरामुळे या सर्व गोष्टींचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्याचबरोबर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झाल्याचे सरकारच्या वतीने सांगितले आहे. यातील सर्वाधिक मृत्यू चेन्नईमधील आहेत. पुराच्या पाण्यातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावपथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

COMMENTS