मुंबई प्रतिनिधी - अभिनेता सनी देओलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध फिरताना दिसत आह
मुंबई प्रतिनिधी – अभिनेता सनी देओलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध फिरताना दिसत आहे. या अभिनेत्याला नीट चालताही येत नसल्याने एक ऑटोचालक त्याला साथ देताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. आता या व्हिडिओवर सनी देओलची प्रतिक्रिया आली आहे.
सनी म्हणाला, ‘मी प्यालो असतो तर…’ आता या व्हिडिओबाबत सनी देओलनेच स्पष्टीकरण दिले आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून अभिनेता आश्चर्यचकित झाला आणि त्याला हसू आवरता येत नाही. याबाबत ते म्हणाले की, हा मुद्दाच नाही. अभिनेता म्हणाला, ‘हे एका शूटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. हे वास्तव नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी करू नये, निवांत रहा. अभिनेता म्हणाला, ‘मला दारू प्यायची असती, तर मी रस्त्यावर किंवा ऑटोरिक्षात असा असतो का. अभिनेता पुढे म्हणाला, ‘सत्य हे आहे की मी मद्यपान करत नाही आणि हा खरा व्हिडिओ नसून चित्रपटाच्या शूटिंगचे रेकॉर्डिंग आहे.’ याआधी एका शोदरम्यान सनी देओलने खुलासा केला होता की तो दारूला हातही लावत नाही. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता यावर्षी ‘गदर 2’ चित्रपटात दिसला, जो ब्लॉकबस्टर ठरला.
COMMENTS