Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई

पुणे ः महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्याठिकाणी मुलींची देशातील पहिली शाळा सुरू केली, तो भिडेवाडा मंगळवारी इतिहासजमा झाला. कारण ही दोन

अमरावतीत तहसीलदार व नायब तहसीलदारांच आंदोलन
कांद्यापाठोपाठ आता लसूण महागला
संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी 17 कोटींचा निधी

पुणे ः महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्याठिकाणी मुलींची देशातील पहिली शाळा सुरू केली, तो भिडेवाडा मंगळवारी इतिहासजमा झाला. कारण ही दोन मजली असलेली भिडे वाड्याची इमारत पुणे महानगरपालिकेने जमीनदोस्त केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने ही कारवाई केली. न्यायालयाने गेल्या महिन्यात सर्व भाडेकरुंच्या याचिका फेटाळत महापालिकेला भिडे वाडा ताब्यात घेण्याचे आदेश दिले. यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात रातोरात भिडे वाडा इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या ठिकाणी आता राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाईल, अशी माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही न झाल्याने महापालिका प्रशासनाने येथील व्यावसायिकांना सोमवारी सकाळी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर पुणे पोलिसांनी भिडेवाडा ताब्यात घेण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली. यावेळी पन्नासहून अधिक पोलिस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेने भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा निर्णय घेतला होता. भिडे वाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बँकेच्या चोवीस भाडेकरूंनी या प्रकरणी पालिकेविरोधात 2010 मध्ये पहिल्यांदा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. ज्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. याप्रकरणी एकूण 80 वेळा सुनावणी झाली. अखेर सर्वोच्च न्यायालयात भिडे वाडा जमीनदोस्त करण्याचे आदेश देत न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम लावला.

COMMENTS