Homeताज्या बातम्यादेश

राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची हत्या

हल्लेखोरांनी घरात घुसून झाडल्या गोळ्या

जयपूर ः राजस्थानमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून, सत्ताबदल होत भाजपची सत्ता आली असतांनाच, मंगळवारी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपू

श्रीगोंद्यातील कोथूळ शिवारात तरुणाची हत्या
पैशाच्या वादातून मालकानेच केली नोकराची हत्या.
पत्नीसह 2 मुलींची गोळ्या घालून हत्या

जयपूर ः राजस्थानमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून, सत्ताबदल होत भाजपची सत्ता आली असतांनाच, मंगळवारी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे जयपूर हादरले असून, हत्येची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. हल्लेखोरांनी गोगामेडींवर एकूण चार गोळ्या झाडल्या. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकून गोगामेडी यांच्या शेजारी राहणार्‍या इतर लोकांनी गोगामेडींच्या घराकडे धाव घेतली. हल्ला झाला तेव्हा गोगामेडी यांच्याबरोबर घरात उपस्थित असलेले अजित सिंह हेदेखील या हल्ल्यावेळी गोळी लागून गंभीर जखमी झाले आहेत. सुखदेव सिंह गोगामेडी मंगळवारी दुपारच्या वेळी त्यांच्या घरीच होते. दुपारी 1.45 वाजता चार हल्लेखोर मोटरसायकलवरून त्यांच्या घरी आले. त्यांनी घरात घुसून गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला. या हल्यात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्याबरोबर असलेले अजित सिंह गंभीर जखमी झाले आहेत. श्यामनगर पोलीस या हत्याप्रकरणाचा तपास करत आहेत. या हत्या प्रकरणावर बोलताना जयपूर पोलीस आयुक्त बी. जी. जॉर्ज जोसेफ म्हणाले, हल्लेखोर कोण होते याची माहिती मिळाली आहे.

हल्लेखोरांपैकी एक जण चकमकीत ठार – राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोरांपैकी एक जण चकमकीत ठार झाला आहे. नवीन सिंह शेखावत असे त्याचे नाव असून तो जयपूरच्या शाहपुरा येथील रहिवासी होता. शाहपुरात त्याचे एक छोटे दुकान आहे. इतर दोन हल्लेखोर रस्त्याने जाणार्‍या व्यक्तीची स्कूटर घेऊन पळून गेले. हल्लेखोरांनी सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकाशी बातचीत केली. गोगामेडी घरात असल्याची माहिती घेतली आणि मग ते घरात घुसून गोळीबार केला, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

COMMENTS