मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरसभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवींना अटक करण्यात आली होती. त्यांना
मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरसभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवींना अटक करण्यात आली होती. त्यांना शुक्रवारी मुलुंड कोर्टाने काही अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. दळवी यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक केली होती. 26 नोव्हेंबर रोजी भांडुपमध्ये कोकणवासीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी भाषणा दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन शिवीगाळ केली होती. या बाबत शिंदे गटाचे कार्यकर्ते भूषण पलांडे यांनी भांडुंप पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दत्ता दळवी यांच्याविरोधात दंड संहितेच्या कलम 153 (अ), 153 (ब), 153(अ)(1) सी,294, 504, 505 (1) (क) अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली होती. कोर्टाने त्यांना या प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. दरम्यान, त्यांना जमिन देण्यात जाणीव पूर्वक उशीर केला जत असल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर मुलुंड कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
COMMENTS