Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी विकास विभागामार्फत आज आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक- आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी उपयोजना व उपयोजना बाहेरील क्षेत्रात आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी रा

बियाण्यांची किंमत वाढवू नका ; कृषिमंत्र्यांचे महाबीजला आदेश
अ‍ॅमेझॉनमध्ये पुन्हा कर्मचारी कपात
जम्प रोप स्पर्धेसाठी अहमदनगर संघाची निवड चाचणीः संदीप कोयटे

नाशिक- आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी उपयोजना व उपयोजना बाहेरील क्षेत्रात आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी राज्य शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती आदिवासी बांधवांपर्यंत पोहचविणासाठी सेवाभावी व्यक्ती व संस्था कार्यरत आहेत. या सेवाभावी संस्था व व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहीत करून त्यांचा सन्मान करण्यासाठी आज 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता महाकवी कालीदास कलामंदीर, नाशिक येथे आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.  या कार्यक्रमात सन 2019 ते 2022 या चार वर्षांच्या कालावधीतील राज्यातील 60 आदिवासी सेवक व आठ सेवा संस्थांना आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

आदिवासी सेवकांना प्रत्येकी रुपये 25 हजार रोख रक्कम व सन्मानपत्र तसेच सेवा संस्थांना प्रत्येकी रूपये 50,001/- रोख रक्कम व सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

COMMENTS