Homeताज्या बातम्यादेश

पहाटेच्या सुमारास तीन देशांना भूंकपाचे धक्के!

 दक्षिण आशियातील देशांत नैसर्गिक संकटांचे प्रमाण वाढले आहे. भूकंपांचे  प्रमाण वाढले आहे. आताही पुन्हा एकदा पाकिस्तान, तिबेट आणि पापुआ न्यू गिनीमध

हिंगोली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाने हाहाकार
मराठवाड्यासह विदर्भात भूकंपाचे सौम्य धक्के

 दक्षिण आशियातील देशांत नैसर्गिक संकटांचे प्रमाण वाढले आहे. भूकंपांचे  प्रमाण वाढले आहे. आताही पुन्हा एकदा पाकिस्तान, तिबेट आणि पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानात 4.2, तिबेटमध्ये 5.0 तर पापुआ न्यू गिनीमध्ये 6.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. अचानक जमीन हादरल्याने नागरिक भयभीत झाले. या घटनेत घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली आहे. गाढ झोपेत असतानाच भुकंपाचे धक्के बसू लागल्याने लोकांनी पळत घरे सोडली.  या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, अनेक घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. आता पुन्हा शेजारील पाकिस्तान आणि तिबेटमध्ये भूकंप झाला आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या भागात आता वारंवार भूकंप येत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानशेजारील अफगाणिस्तानाच असाच विनाशकारी भूकंप झाला होता. या भुकंपात दोन हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू  झाला होता. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानात भूकंप झाला आहे. मागील काही दिवसांपासून दक्षिण आशियातील अनेक देशांत भूकंपांचे झटके बसत आहेत. भारत, नेपाळ, अफगाणिसस्तान, बांग्लादेशनंतर आता पाकिस्तानात पुन्हा एकदा जमीन हादरली आहे.

COMMENTS