सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटी बसचा चाक निखळला आहे. सोलापूर डेपोमधून नांदेडकडे रवाना झाल्यानंतर दहा ते पंध
सोलापूर / प्रतिनिधी : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटी बसचा चाक निखळला आहे. सोलापूर डेपोमधून नांदेडकडे रवाना झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत अपघात झाला आहे. धावत्या एसटी बसचा चाक निखळल्याने एसटी प्रशासनाच्या तांत्रिक विभागावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची भीषणता मोठी होती, धावती बस महामार्गावर चाक निखळून पलटी झाली. सुदैवाने यामध्ये मोठी जीवितहानी झाली नाही. एसटी खात्याचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उळे कासेगाव या अपघाताठिकाणी दाखल झाले आहेत. हा अपघात रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
सोलापूर डेपोमधून एसटी बस रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नांदेडकडे रवाना झाली होती. बसमधून जवळपास 15 ते 20 प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर शहरा जवळ असलेल्या उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटला आणि चाक निखळला. जॉईंट तुटल्याने धावती बस महामार्गावर हेलकावे खात पलटी झाली आणि अपघात झाला. धावत्या एसटी बसमधील अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एसटी बसेसच्या वाढत्या अपघातामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण – सोलापूर बस स्थानकातून नांदेडकडे निघालेल्या एसटी बसचा 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर उळे कासेगाव येथे अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवाशांचे नशीब बलवत्तर होते म्हणून सर्वांचे प्राण वाचले. एसटी बस थांबल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे राज्य परिवहन महमंडळाच्या बसमधून प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. ही एसटी बस डेपोतून बाहेर पडताना तपासण्यात आली नव्हती का? असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात आला आहे. वाढत्या अपघातामुळे एसटी बसने प्रवास करणार्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अपघाताची माहिती मिळताच एसटी खात्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी हे शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत.
COMMENTS