कोपरगाव ः संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी देशात सर्वप्रथम सहकारम
कोपरगाव ः संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी देशात सर्वप्रथम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती सुरू केली असून 2023-24 चालु गळीत हंगामातील ज्युसपासुन उत्पादित पहिल्या इथेनॉल टँकरचे विधीवत पुजन उपाध्यक्ष मनेष गाडे व संचालक सर्वश्री. बाळासाहेब वक्ते, बापूसाहेब बारहाते, रमेश घोडेराव, बाळासाहेब पानगव्हाणे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यांत आले.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या सर्व सहकारी मंत्री मंडळाने इथेनॉल उत्पादनांस सर्वोच्च प्राधान्य देत त्यानुरूप ध्येय धोरणे घेतली त्याचा सहकारी साखर कारखानदारीला मोठया प्रमाणांत फायदा होत आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम तेल कंपन्याबरोबर कारखान्यात चालु गळीत हंगामात 90 लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा करण्यांचे करार केले आहेत त्यातील पहिल्या टप्पात 60 लाख लिटर्स इथेनॉलचे उददीष्ट ठेवण्यांत आले असुन त्याच्या परिपुर्तीसाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशिल आहे. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क उपाधिक्षक गणेश कसरे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, आसवनी विभागप्रमुख राधाकृष्ण जंगले, वैभव वाघ, टी. व्ही. देवकर, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार उपस्थित होते. कारखान्याच्यावतीने इथेनॉल वाहतुक करणा-या चालकांचा उपाध्यक्ष मनेष गाडे व संचालक बाळासाहेब वक्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. शेवटी आसवनी विभाग प्रमुख राधाकृष्ण जंगले यांनी आभार मानले.
COMMENTS