Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील 11 तालुके दुष्काळी घोषित

पुणे ः राज्यातील दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस चिंताग्रस्त बनत असतांना, नोव्हेंबर महिन्यातच अनेक भागात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. जनावरा

सिसोदियांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
मुंबईत डॉक्टरच्या कारची धडक ; बाईकस्वार मृत्युमुखी
फुटीरतेच्या वाटेवर!

पुणे ः राज्यातील दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस चिंताग्रस्त बनत असतांना, नोव्हेंबर महिन्यातच अनेक भागात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्यातील स्थितीदेखील कठीण बनत आहे.
पुणे जिल्ह्यातील दुष्काळसदृष परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर 11 तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात यापूर्वी केंद्राच्या निकषानुसार बारामती, पुरंदर हे दोन तालुके पूर्णतः तर इंदापूर, शिरूर आणि दौंड तालुक्यात अंशतः दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने जिल्ह्यातील 31 महसूल मंडळांचा दुष्काळाच्या यादीत मुळशी, वेल्हे हे दोन तालुके वगळता अन्य सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळांचा समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 11 तालुके दुष्काळी म्हणून घोषित झाले आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या ठिकाणी 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा गावांचा समावेश करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 75 टक्के कमी पाऊस झाल्याने या गावांना टंचाईसदृश म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

COMMENTS