Homeताज्या बातम्याक्रीडा

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये PM मोदी

गुजरात प्रतिनिधी - आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेल

कट्टर भ्रष्टाचारी बंगळुरुमध्ये एकत्र
अखेर मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना… अमेरिकेत करणार ‘ही’ कामे…
कोची दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

गुजरात प्रतिनिधी – आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सात गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात झालेल्या या पराभवाने करोडो भारतीयांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपुर्ण राहिले. या पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू खूपच भावूक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतलीटीम इंडियाच्या विश्वचषकातील पराभवाने देशभरातील क्रिकेट प्रेमी निराश झाले आहेत.स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहाव लागल्याने 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. या पराभवामुळे भारतीय खेळाडू खूपच निराश झालेत. त्यांना धीर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमला भेट दिली. टीम इंडियाच्या पराभवानंतर पंतप्रधानांनी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. मोहम्मद शमीने एक फोटो ट्विट केला आहे. या पोस्टमध्ये भावूक झालेल्या शमीला पंतप्रधान मोदी धीर देत असल्याचे दिसत आहे

COMMENTS