Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल

मुंबई प्रतिनिधी :-  राज्यातील प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. गेल्या १५ दिवसात एसटी महामंडळाने

धोक्याची घंटा
पदोन्नतीतील आरक्षणाबाबत राज्य सरकारची दिरंगाई
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला बीड जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.मंजुषा दराडे यांची निवड

मुंबई प्रतिनिधी :-  राज्यातील प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. गेल्या १५ दिवसात एसटी महामंडळाने तब्बल ३३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हंगामी दरवाढ करूनही अनेक प्रवाशांनी एसटी बसलाच पसंती दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अजूनही या कमाईत मोठी वाढ होऊ शकते, असं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच मराठा आंदोलनाचा फटकाही एसटीला बसला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी बसेसची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस एसटी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. मात्र, दिवाळीत एसटीने मोठी कमाई केली आहे.

दिवाळीच्या दिवसांसह नोव्हेंबरमधील पहिल्या पंधरवड्यात प्रवाशांनी प्रवासासाठी एसटीला प्रथम पसंती दिली आहे. यामुळे महामंडळाने ३२८.४० कोटींचा महसूल मिळवला आहे. भाऊबीजेच्या मुहूर्तावर अर्थात १५ नोव्हेंबरला सर्वाधिक ३१.६० कोटींची कमाई एसटी महामंडळाने केली आहे. १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूकीतून ३२८,४०,०२,००० रुपयांचा अर्थात ३२८ कोटी ४० लाख दोन हजार रुपये इतका महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२२ मध्ये महामंडळाने २३१ कोटींचा महसूल मिळवला होता. भाऊबीजेच्या मुहूर्तावर प्रवाशांनी यंदा एसटीला तब्बल ३१ कोटी ६० लाखांची ओवाळणी दिली आहे. ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान महामंडळाचे किमान उत्पन्न २१ कोटी आणि कमाल उत्पन्न ३१ कोटी होते. मुंबई महानगर प्रदेशातून ५५ कोटी २ लाखांचा महसूल महामंडळाच्या तिजोरीत जमा केला आहे. मुंबई महानगरात ठाणे विभागाने १३ कोटी ६७ लाखांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले आहे

COMMENTS