कर्जत ः सीना परिसरात सरासरीपेक्षा कमी पर्जन्य झाल्याने भूजल पातळी खालवली आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकर्यांच्या सर्
कर्जत ः सीना परिसरात सरासरीपेक्षा कमी पर्जन्य झाल्याने भूजल पातळी खालवली आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकर्यांच्या सर्व आशा आकांक्षा या आता रब्बी पिकावर अवलंबून आहेत. पिके ऐन भरात आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी आ. राम शिंदे यांच्याकडे केली. त्याची तात्काळ दखल घेऊन व वस्तुस्थितीची योग्य माहिती देऊन त्वरीत सीना धरणाचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आ. शिंदे यांनी दिले. त्यानुसार सीना उजवा कालवा आवर्तन दि. 18 नोव्हेंबर रोजी सोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या आवर्तनामुळे सीना पट्टयातील पिकांना जीवदान मिळणार आहे. योग्य वेळेस आवर्तन सुटणार असल्यामुळे शेतकरी सुखावणार आहेत. शेतकर्यांची मागणी लक्षात घेऊन तात्काळ निर्णय करून आवर्तन सोडण्याचे आ. शिंदे यांनी आदेश दिल्यामुळे सीना परिसरातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी म्हटले आहे.
COMMENTS