Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 आदिवासी विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीतील विशेष शिबीरात मार्गदर्शन – डॉ. प्रकाश कोल्हे 

   नाशिक प्रतिनिधी - नव रचना ट्रस्ट व सदिच्छा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील दत्तक योजना आयोजित आठ दिवसीय आदिवासी विद्य

’पीएफआय’संबंधित 17 ठिकाणांवर छापे
संगमनेरच्या उपकारागृहातून चार कैदी फरार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अहमदनगरचं नातं | Ambedkar Jayant Special | LokNews24

   नाशिक प्रतिनिधी – नव रचना ट्रस्ट व सदिच्छा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील दत्तक योजना आयोजित आठ दिवसीय आदिवासी विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. या शिबीरात आदिवासी भागातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व विशेष विषयाचे अधिक ज्ञान मिळावे याकरिता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या सांगता समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी उपस्थित शिबिरार्थीना मार्गदर्शन करताना केवळ परिस्थितीपुढे हतबल न होता किंवा कुणी आपल्यासाठी धावून येण्याची वाट न पाहता आपण स्वतः आपले ध्येय निश्चित करून ध्येय पूर्तीसाठी प्रामाणिकपणे कष्ट केल्यास आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. जीवनात आपण मिळविलेले यश हे आपल्या स्वतः साठी त्याच बरोबर आपल्या कुटुंबाकरीता फायदेशीर ठरेल त्याच प्रमाणे आपल्यासोबत आपल्या समाजालाही प्रगतीपथावर येण्यास मदत होईल.तसेच आपण मिळविलेल्या यशातून  राष्ट्र विकास साधला जाईल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यावेळी केले.

      आदिवासी भाग म्हटला म्हणजे मागास म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु आज शासकीय व निम शासकीय तसेच विविध खाजगी संस्थांच्या माध्यमातून विविध स्तरांवर त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहे. आपण त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यावा. असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले. 

या कार्यक्रमात मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यानी आपल्या मध्ये असलेले वाईट गुण शोधून त्याची होळी करण्यात आली व चांगल्या गुणाची वाढ करून आपले जीवन सुखी व समृद्ध करण्याचा संकल्प यावेळी त्यांनी केला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  हेमलता ताई बिडकर, अरूण जोशी, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक योगेश गायकवाड , श्री जाधव सर, श्री राठोड सर, सुर्यवंशी सर, दिक्षित ताई, पुष्पाताई आदी मान्यवर उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी नव रचना ट्रस्ट व सदिच्छा फाउंडेशनचे पदाधिकारी व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS