Homeताज्या बातम्यादेश

२२ लाख २३ हजार दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी

अयोध्या प्रतिनिधी - देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीचं खास आकर्षण असलेला प्रभू श्री राम नगरीतील दिपोत्सवाने यंदा जागत

पेट्रोलच्या माध्यमातून आघाडी सरकारकडून राज्यातील जनतेचे शोषण सुरु
शिर्डीत श्री रामनवमी उत्‍सवाला आजपासुन सुरूवात ; विविध कार्यक्रमांचे आयोजन
अखेर राजद्रोहाचे कलम स्थगित | DAINIK LOKMNTHAN

अयोध्या प्रतिनिधी – देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीचं खास आकर्षण असलेला प्रभू श्री राम नगरीतील दिपोत्सवाने यंदा जागतिक रेकॉर्ड केला आहे. दिवाळीनिमित्त अयोध्येत खास सजावट करण्यात आली आहे.दिवाळीच्या पूर्वसंध्येला शरयू नदीच्या तिरावर लाखो दिव्यांनी रोषणाई करण्यात आली होती. रामनगरीत 22 लाख 23 हजार दिवे प्रज्वलित होताच अनोखा इतिहास रचला गेला. दिवे लावण्याच्या या विक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.’अयोध्या दीपोत्सव 2023′ मध्ये दिवे लावण्याचा नवा विश्वविक्रम झाला आहे. यापूर्वी 18 लाख 81 हजार दिवे लावण्याचा विक्रम होता, तो मोडून यंदा दीपोत्सव कार्यक्रमात 22 लाख 23 हजार दिवे लावण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे. या विक्रमाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टीमने प्रमाणपत्र दिले आहे. शेकडो स्वयंसेवकांनीपरिश्रम घेऊन हे २४ लाख दिवे लावले आहेत. अयोध्या दीपोत्सव कार्यक्रमात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्यासह ५० हून अधिक देशांचे राजदूत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीची आरती केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या दिव्यांच्या भव्य उत्सवात सहभागी होण्यासाठी इतर राज्यातून आणि शहरातील लोक आले होते. तसेच जगातील १०० हून अधिक देशांमध्ये या दीपोत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. रात्रीच्या ‘लाइट अॅण्ड साऊंड’ कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या दिपोत्सवाचा डोळे दिपवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

COMMENTS