Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदूषण निवारण मंडळाची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब कासार,कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. देवदत्त शेटे

अकोले ः निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची अकोले तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब कासार, कार

केडगावमध्ये शरद पवारला तिघांची शिवीगाळ व मारहाण
संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत सृष्टी, संस्कृती, सिद्धी, रिद्धी व संस्कार यांचा गौरव

अकोले ः निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची अकोले तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब कासार, कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. देवदत्त शेटे, सचिवपदी सुनील शेळके यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र मालुंजकर आणि प्रतिभा देशमुख यांची निवड करण्यात आली.
       मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश खरबस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तालुका कार्यकारिणी सहसचिवपदी विजया ठोंबाडे, संपर्क प्रमुखपदी हेमंत कुसळकर, खजिनदार बाळासाहेब तोरमड, प्रकल्पप्रमुख अनिल पवार, कायदेविषक सल्लागार वकील मंगला हांडे तर जिल्हा प्रतिनिधीपदी प्रकाश महाले यांची निवड करण्यात आली. तर राज्यकार्यकारिणी सदस्य म्हणून माजी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सतीश नेहे यांची निवड करण्यात आली. तालुका कार्यकारिणी सदस्यपदी प्रा.दीपक जाधव, ज्ञानेश्‍वर जोर्वेकर, अश्‍विनी काळे-फापाळे, ललित छल्लारे, गोरख देशमुख, सचिन फुलसुंदर, गणपत काळे, दत्ता जाधव, संदीप बर्वे, धनंजय गाडेकर, नामदेव सोंगाळ, क्रांती रेवगडे वाळुंज, बाळू घोडे, भारत पिंगळे आदींची निवड करण्यात आली. या मंडळाला सल्लागार म्हणून पद्मश्री बिजमाता राहीबाई पोपेरे, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, रामलाल हासे, जितीन साठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोददादा मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुधाकर शेटे, राज्य कार्यकारिणी सदस्य राम वाकचौरे, राज्य प्रसिद्धीप्रमुख रमेश खरबस यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

COMMENTS