Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपांप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण

विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात हा पराभव स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे- राज ठाकरे 
उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी धरला जोर
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा कर्नाटकात परिणाम दिसला : राज ठाकरे

मुंबई : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपांप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते राज ठाकरे यांच्याविरोधात दाखल गुन्हा आणि आरोपपत्र उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. त्यामुळे, राज यांना दिलासा मिळाला आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राहण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या मुदतीनंतरही राज हे मतदारसंघात होते. असे करून त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला, असा आरोप त्यांच्यावर होता. राज्य निवडणूक आयोगाने राज यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा आणि आरोपपत्र दाखल केले होते.

COMMENTS