अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसुली मंडळाचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला असून,या गावांना दुष्काळी परीस्थी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसुली मंडळाचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला असून,या गावांना दुष्काळी परीस्थीतीत देण्यात येणार्या सर्व सवलतींचा लागू होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
गुरूवारी मंत्रालयातील वॉर रुममध्ये झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित गावांच्या बाबतीत जिल्हाधिका-यांकडून लवकरच अहवाल मागवून या गावांबाबतही निर्णय केला जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. या बैठकीस मदत व पूर्नवसन मंत्री अनिल पाटील, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुडे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, फलोत्पादन व रोजगार हमी विभागाचे मंत्री संदिपान भुमरे, मदत व पुर्नवसन विभागाचे अतिरिक्त सचिव सोनिया शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, कृषी विभागाचे सचिव सुनिल चव्हाण उपस्थित होते.
नुकताच केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र जिल्ह्यातील तालुक्यातील पर्जन्यमानाची टक्केवारी 75 पेक्षा कमी आणि 750 मिमि पेक्षा कमी पाऊस पडलेला हा निकष लक्षात घेवून अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 गावांचा समावेश आता दुष्काळी गावांच्या यादीत झाल्याने या गावांना जमीन महसूल घट,पिक कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती कृषी पंपाच्या वीज बीलाच्या वसुलीत स्थगिती शालेय व महाविद्यालयीन फी माफी रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पाण्याचे टॅकर्स आशा सवलती तातडीने लागू करण्याता निर्णय बैठकीत घेण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. राज्यात पशुधनाच्या चाराकरीता 1 लाख लाभार्थी शेतकर्यांना 5 लाख टन मुरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार असून यासाठी लागणार्या 30 कोटी रुपये खर्चासाही मान्यता आजच्या बैठकीत मान्याता देण्यात आली असून पशुपालकांचे नूकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. नव्याने अस्तित्वात आलेली महसूली मंडळे जिथे अद्याप पर्जन्यमापक बसवलेले नाहीत किंवा बिघडलेली आहेत आशा महसूली मंडळांचे अहवाल जिल्हाधिकार्याकडून मागविण्यात आले असल्याचेही विखे पाटील म्हणाले. नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश असून यामध्ये नालेगांव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुई छत्तीशी, विरगाव, समशेरपूर, साक्रीवाडी, राजुर, शेंडी, कोतूळ, ब्राम्हणवाडा, अकोले, जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, कर्जत, राशीन, भांबोरा, कंबोळी, मिरजगाव, माही, कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव, नेसावा खुर्द, नेवासा बुद्रूक, सतलबपुर, कुकाणा,चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा बहिरोबा, पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हान, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी, पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी मानूर, करंजी, मिरी, राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी, राहुरी बुद्रूक, सात्रळ, ताहाराबाद, देवळाली प्रवरा, टाकळीमियॉ, ब्रॉम्हणी, वांबोरी, संगमनेर बुद्रूक, धांदरफळ बुद्रूक, आश्वी बुद्रूक, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकुर, पिंपरणे, शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एंरडगाव, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेनगाव, चिंबळा, देवदैठन, कोळेगाव, श्रीरामपूर, बेलापूर बुद्रूक, उंदिरगाव, टाकळीभान जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे.
COMMENTS