Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगलीमध्ये पावसाची हजेरी

सांगली : जिल्ह्यातील शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यात बुधवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. दिवाळीत थंडी सुरू होण्याची अपेक्षा असताना पावसाचे आगमन द्र

मोफत प्रवेशाच्या लॉटरीची प्रतिक्षा
शीतल वाली यांनी स्वीकारला वरिष्ठ वित्त विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार
ओबीसी आरक्षणात घुसखोरी नकोच

सांगली : जिल्ह्यातील शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यात बुधवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. दिवाळीत थंडी सुरू होण्याची अपेक्षा असताना पावसाचे आगमन द्राक्ष बागांना धोकादायक ठरणारे आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान असून काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. शिराळा तालुक्यातील मांगले परिसरात पहाटे पासून पाऊस सुरु होता. तासगाव, पलूस भागात सातनंतर पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास हलका पाऊस पडला. द्राक्षाच्या फळछाटण्या झाल्या असून सध्या द्राक्ष घड कळी, फुलोर्‍याच्या स्थितीत असून यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने बुरशीजन्य दावण्या रोगाचा प्रादुर्भाव बळावण्याची शक्यता आहे.

COMMENTS