Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात होता साखळी बॉम्बस्फोटाचा कट

पुणे :  पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनएआयएने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला अटक केल

कोरेगाव भीमात बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले
वाढती महागाई, बेरोजगारी आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
‘वाराई’च्या प्रश्नासंदर्भात व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये : जिल्हाधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन

पुणे :  पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनएआयएने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला अटक केली आहे. त्याच्याकडील तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, या दहशतवाद्यांकडून पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.  कोथरूड परिसरात 19 जुलै 2023 रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. परंतु घरझडती घेण्यासाठी जात असताना शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. पुण्यात दहशतवाद्यांचा साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. यासाठी त्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा कट हा उधळून लावण्यात आला आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याच्या तपासातून ही माहिती मिळाली आहे.

COMMENTS