Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमधील अपघातात तिघांचा मृत्यू

कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील किरवली पुलावरून इनोव्हा कार थेट खाली कोसळल्यानंतर ही गाडी एका मालगाडीला धडकली. या घटनेत तिघे जागीच ठा

शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कारच्या धडकेत 8 वारकर्‍यांचा मृत्यू
इस्कॉन ब्रीजवर भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू अनेक जखमी

कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील किरवली पुलावरून इनोव्हा कार थेट खाली कोसळल्यानंतर ही गाडी एका मालगाडीला धडकली. या घटनेत तिघे जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास घडली. मृतांमध्ये रिपाइंच्या नेत्याचा देखील समावेश आहे. कार वरील चालकांचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती आहे.
धर्मानंद गायकवाड असे या अपघातात ठार झालेल्या रिपाइंच्या नेत्याचे नाव आहे. ते रायगड जिल्हा संपर्क प्रमुख होते. इतर दोघे आणि जखमी व्यक्तीची नावे समजू शकलेली नाही. धर्मानंद गायकवाड हे त्यांच्या काही सहकार्‍यांसोबत जात असताना ते कर्जत किरवली पुलाजवळ आले असता इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रक सुटले. यावेळी त्यांची कार ही पुलाचे कठडे तोडून थेट खाली कोसळली. या वेळी त्यांच्या गाडीला थेट मालगाडीने धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जखमींना दवाखान्यात दाखल केले. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. अपघाताचे कारण स्पष्ट झाले नसले तरी हा अपघात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

COMMENTS