Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनेशी अश्‍लील वर्तन; सासर्‍यावर गुन्हा

पुणे: सुनेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या सासर्‍याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत 32 वर्षीय सुनेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात

उद्योजकाला प्रेमात अडकवून उकळले सव्वा कोटी
पुण्यात झोपमोड केल्याने भाडेकरुनेच केली घरमालकाची हत्या
महिलेचा विनयभंग, पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: सुनेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या सासर्‍याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत 32 वर्षीय सुनेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार 62 वर्षीय सासर्‍याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला आणि तिच्या पतीचा वाद झाला होता. ती वेगळी राहत होती. सून ही हिंगणे खुर्द परिसरातील एका मंदिरासमोर थांबली होती. त्या वेळी सासरा तेथे आला. ‘आपल्या समाजात दुसरे लग्न करायची प्रथा नाही. मी तुला सदनिका घेऊन देतो. मुलगा आणि सासूला सांगू नको. मी तुझा सांभाळ करेन’, असे सांगून सासर्‍याने सुनेचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

COMMENTS