Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस टी बस मधून महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

अहमदनगर : एस. टी. बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने शेजारी सहप्रवासी म्हणून बसलेल्या एका अनोळखी महिलेने हातचलाखी करत चोरल्य

नगर-मनमाड महामार्ग बंद आंदोलन स्थगित
कुकडी पाण्याबाबत दिवा विझण्यापूर्वीची धडपड बंद करावी : पप्पूशेठ धोदाड
ढोरजेत महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांची संयुक्त जयंती उत्साहात

अहमदनगर : एस. टी. बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने शेजारी सहप्रवासी म्हणून बसलेल्या एका अनोळखी महिलेने हातचलाखी करत चोरल्याची घटना राहुरी बसस्थानक ते नगर शहरातील सावेडी बस स्थानकादरम्यान घडली.

याबाबत गीतांजली विजय सूर्यवंशी (वय ३८, रा. हडपसर, पुणे) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी या राहुरी हून पुण्याकडे जाण्यासाठी एस.टी. बसमध्ये बसल्या होत्या. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्याकडील सोन्याची ठुशी व गंठण असे सुमारे ८८ हजार रुपये किमतीचे दागिने आपल्या पर्समध्ये ठेवून पर्स आपल्या बॅगमध्ये ठेवलेली होती. या प्रवासात त्यांच्याजवळ एक अनोळखी महिला सहप्रवासी म्हणून बसली. ती सावेडी बसस्थानकात उतरली. मात्र तत्पूर्वी सूर्यवंशी या बसच्या रॅक मधील पिशवी काढत असताना त्या महिलेने हात चलाखी करत सूर्यवंशी यांच्या पर्स मधील सोन्याचे दागिने काढून घेतले. काही वेळाने हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर सूर्यवंशी यांनी रात्री तोफखाना पोलिस ठाणे गाठले.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गीतांजली विजय सूर्यवंशी (वय ३८, रा. हडपसर, पुणे) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी महिलेच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS