Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढोलेवाडी व बोरबन ग्रामपंचायत बिनविरोध

सरपंचपदी शालिनी ढोले, अरुणा गाडेकर यांची निवड

संगमनेर ः एक तालुका एक परिवार ही संकल्पना जपताना संगमनेर तालुक्यामध्ये होत असलेल्या सातही ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीची मुसंडी
जामनेर तालुक्यातील १२ पैकी ९ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात
ग्रामपंचायतीचे मतदान जवळ येत असल्याने उमेदवार मतदारांच्या गाठीभेटीला वेग  

संगमनेर ः एक तालुका एक परिवार ही संकल्पना जपताना संगमनेर तालुक्यामध्ये होत असलेल्या सातही ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांमध्येच लढत होत असून यापैकी ढोलेवाडी व बोरबन ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून ढोलेवाडीच्या सरपंचपदी माजी उपसभापती सौ शालिनीताई बाळासाहेब ढोले यांची तर बोरबनच्या सरपंचपदी अरुणाताई बाळासाहेब गाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संगमनेर तालुक्यातील सात ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होत आहे यात माघार घेण्याच्या दिवशी प्रथम ग्रामपंचायत दर्जा मिळालेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून सरपंचपदी माजी उपसभापती शालिनीताई बाळासाहेब ढोले यांची एक मतांनी निवड झाली आहे तर सदस्य पदी. सौ निशा दत्तात्रय भरीतकर, शंकर बाबुराव ढोले, सौ ढोले वैशाली शिवाजी, सौ दारोळे सुरेखा संदीप, बुळकुंडे प्रियशा विलास, ढोले अमोल शरद, पंकज सुभाष शिंदे, सुनील सूर्यभान मस्के यांची निवड झाली आहे. तर एक जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. तर बोरबनच्या सरपंचपदी अरुणाताई बाळासाहेब गाडेकर, सदस्यपदी ज्ञानेश्‍वर भाऊसाहेब गाडेकर, मनीषा गणेश गडगे, सारिका किरण गाडेकर, सविता रावसाहेब मेंगाळ, केशव मारुती गाडेकर यांची निवड झाली आहे, तर दोन जागा रिक्त आहेत. या सर्व उमेदवारांच्या बिनविरोध साठी ढोलेवाडी व बोरबण येथील शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या निवडीनंतर शालिनीताई ढोले म्हणाल्या की काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुंजाळवाडी ग्रामपंचायत मधून ढोलेवाडी ग्रामपंचायतला वेगळा दर्जा मिळाला आहे. ही पहिली निवडणूक असून बिनविरोध होत असल्याने हा विजय सर्वांचा आहे. या पुढील काळात आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिक विकास आपण करू असेही त्या म्हणाल्या. तर बोरबनच्या सरपंच सौ.अरुणा गाडेकर म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत तालुका म्हणून संगमनेर तालुक्याची ओळख आहे गावची एकदा जपताना सर्व ग्रामस्थांनी आपल्यावर विश्‍वास ठेवला असून या पुढील काळात आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास अधिक वेगाने करू असेही त्या म्हणाल्या. या सर्व विजयी उमेदवारांचे व विनोद करण्यासाठी परिश्रम घेणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, अ‍ॅड. माधवराव कानवडे, बाजीराव खेमनर, मिलिंद कानवडे, रणजीत सिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, अजय फटांगरे, बाळासाहेब ढोले, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, आदींचा विविध पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS