Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड-आष्टी रोडवरील भीषण अपघातात 5 जण ठार

खासगी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने अपघात ; 23 जण जखमी

जामखेड ः जामखेड आष्टी दरम्यान आष्टा फाटयाजवळ मुंबई वरून बीडकडे जात असलेल्या खाजगी सागर ट्रॅव्हल्स (एन.एल.01 बी 2499) आली असता ड्रायव्हरचा गाडीवरी

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात चालकाचा मृत्यू
पुण्यात थार गाडीने एकाला चिरडले
नगर-मनमाड रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू

जामखेड ः जामखेड आष्टी दरम्यान आष्टा फाटयाजवळ मुंबई वरून बीडकडे जात असलेल्या खाजगी सागर ट्रॅव्हल्स (एन.एल.01 बी 2499) आली असता ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटला अन् भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दूर्देवी घटना 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चालकाचा ताबा सुटल्याने लग्झरी बस सुमारे 200 फुट रोडवर घसरत पुढे गेली.
अपघाताची माहिती मिळताच, जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपली रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळाकडे वेगाने पोहचले. जखमींची संख्या जास्त असल्याने अनेक रूग्णवाहिका अपघातस्थळी धावल्या. जखमींना अहमदनगर जामखेड आष्टी या ठिकाणी उपचारासाठी तातडीने दखल केले. या अपघातात आष्टी ग्रामीण रुग्णालयात चार जण व जामखेडला एक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये धोंडीबा यशवंत शिंदे (वय 36 रा. भिल्लारवाडी पो. जाटनांदूर ता. शिरूर जि. बीड) देविदास दत्तू पेचे  (रा. सौताडा ता. पाटोदा जि.बीड), अशोक महादेव भोंडवे (पिट्टी नायगाव ता.पाटोदा जि. बीड ), महमद आसिफ दोस्त महमद खान (रा.कुर्ला मुंबई पश्‍चिम) रवी यादव गोंडवे (वय 28, मोतीनगर डीग्रस ता.पुसद जि.यवतमाळ) या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 23 जण जखमी झाले असून जामखेड येथे खाजगी दवाखान्यात करण जगदिश साबरिया (वय 4 महिने) डिग्रस पूसद,शाम वानखेडे (वय 19), रज्जाक पठाण  (37) जामखेड, परसराम रणसिंग  (45) , लक्ष्मी परसराम रणसिंग  (40) आपटी ता जामखेड, आशिष मोहिते (35) शितल मोहिते (30) वीर आशिष मोहिते वय (3 वर्षे) जवळा ता जामखेड. मच्छिंद्र जायभाय (33) तांदूळवाडी बीड,जैनब मुस्तकीम शेख (44), प्रतीक्षा चव्हाण बीड असे अकरा जण उपचार घेत आहेत. उर्वरित जखमी अहमदनगर आष्टी याठिकाणी उपचारासाठी पाठविले आहेत. जामखेड ग्रामीण रुग्णालयात एकाचा तर आष्टी मध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक जण गंभीर असून अहमदनगर आष्टी जामखेड या ठिकाणी उपचारासाठी तातडीने दखल केले आहेत. आ. सुरेश धस सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे,माजी सरपंच सुनिल कोठारी यांनी धाव घेत मदत चालू केली. घटनास्थळी तातडीने 10-12 रुग्णवाहिका व दोन जेसीबी बोलविण्यात आले. जेसीबीने रस्त्यावर आडवी पडलेली अपघातग्रस्त बस बाजुला घेतली व नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी संदेश कोठारी, आमोल गिरमे, गणेश डोंगरे, चिंचपूरचे सरपंच ढवळे मेजर, आष्टा सरपंच पठाडे, जामखेडचे वसीम सय्यद, गणेश बांदल, प्रविण उगले, आ. रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनय डुकरे, गुलाब पटेल युवा मंच चिंचपूर देवाचे, दीपक भोरे, विशाल ढवळे, अशोक टेकाळे तात्या राक्षे आदींनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोठी मदत केली.

COMMENTS