Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालमत्ता कराची 200 कोटींची थकबाकी वसूल

पुणे : पिंपरी महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने थकीत कर वसूल करण्यावर भर दिला आहे. 2023-24 चालू आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात 201 को

Sanjay Raut l शिवाजी महाराजांच्या अपमानाचा निषेध करणाऱ्यांवर ‘राजद्रोहा’चा गुन्हा का? | LOKNews24
‘अहिंसा व विश्वशांतीसाठी भारताला सामर्थ्यवान बनवावे लागेल’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा ; २०८८ सहायक प्राध्यापक पदे भरण्यास मान्यता

पुणे : पिंपरी महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने थकीत कर वसूल करण्यावर भर दिला आहे. 2023-24 चालू आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात 201 कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसुली केली आहे. 41 हजार 307 जणांना जप्ती नोटीसा तर 36 हजार 719 मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. जप्त मालमत्तांचा आता लिलाव करण्यात येणार आहे.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख सात हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. आतापर्यंत 604 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेण्यात आली असून थकबाकीदार तत्काळ थकीत कर भरत आहेत. शहरातील मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. थकबाकी वसूल होत नसल्याने दरवर्षी हा आकडे वाढतच होता. त्यामुळे जुनी थकबाकी वसूल करण्यावर भर दिला. थकबाकीदारांचा चालू कर आणि थकीत कर भरण्याकडे कल वाढत असल्याने 2022-23 आणि 2023-24 मध्ये आतापर्यंत 555 कोटी रुपयांची जुनी थकबाकी वसूल केली आहे. यामध्ये प्रामुख्याने निवासीसह बड्या थकबाकीदार बिगर निवासी मालमत्ता धारकांकडून कर वसूल केला आहे. कर संकलन विभागाने 41 हजार 307 जणांना जप्ती नोटीसा तर 36 हजार 719 मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ता धारकांकडे 600 कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले. जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. जप्ती मोहीम कशा पद्धतीने राबवता येईल याचा कालबद्ध कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. शहरात चालू असलेले सर्वेक्षण महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत क्रांतिकारी ठरणार आहे. त्यात कुठल्या त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

COMMENTS