Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आत्मा अंतर्गत महिला किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न

आष्टी प्रतिनिधी - कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत श्री.एस.एम.साळवे सर प्रकल्प संचालक आत्मा,बीड व श्री गोरख तरटे ता

स्फोटकप्रकरणी वाझे करणार होता दोन हत्या ; एनआयएच्या तपासात उलगडले रहस्य
रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी नऊ चालकांविरुध्द गुन्हा दाखल
सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांची टीका

आष्टी प्रतिनिधी – कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत श्री.एस.एम.साळवे सर प्रकल्प संचालक आत्मा,बीड व श्री गोरख तरटे तालुका कृषि अधिकारी,आष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मांडवा ता.आष्टी येथे महिला किसान गोष्टी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी आत्माचे राजेंद्र धोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच श्री.प्रशांत पोळ मंडळ कृषी अधिकारी आष्टी यांनी रब्बी हंगाम ज्वारी व हरबरा या पिकावर सविस्तर मार्गदर्शन केले,श्री.जगदणे साहेब मंडळ कृषी अधिकारी यांनी किड व रोग व्यवस्थापन या विषयी माहिती दिली,प्रा श्री.यादव सरांनी रेशीम पिकाबाबत मार्गदर्शन केले,श्री बेग साहेब यांनी सेंद्रीय शेती विषयी माहिती दिली श्रीमती अंजली टकले मॅडम यांनी किटकांची ओळख,तसेच फवारणी किटचे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले या वेळी शाळेतील मुलींनी नवरात्री निमित्त नऊ देवींचे रूप घेऊन पौष्टिक तृणधान्यवर सुंदर गीत सादर केले या वेळी गावचे सरपंच श्री.माळी साहेब उपसरपंच श्री.मुटकुळे साहेब व गावातील महिला गट व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..

COMMENTS