Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जोगेश्‍वरवाडीतील दोघांना पोलिसांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

युवकांना मारहाण करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचा कर्जतमध्ये निषेध

कर्जत : कर्जत तालुक्यातील जोगेश्‍वरवाडी येथील दोघा युवकांना भिगवण पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केल्याची तक्रार भिगवण येथील पोलीस

विश्‍वासार्हता हे वर्तमानपत्राचे खरे भांडवल ः विजय कुवळेकर
सामाजिक शांतता भंग करणार्‍याविरुद्ध पोलिस स्वतःहून कारवाई करणार
’पासष्टी’ सारखी पुस्तकनिर्मिती माणुसकीची संस्कृती ः लेविन भोसले

कर्जत : कर्जत तालुक्यातील जोगेश्‍वरवाडी येथील दोघा युवकांना भिगवण पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केल्याची तक्रार भिगवण येथील पोलीस अधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. युवकांना केलेल्या मारहाणीचा युवक क्रांती दल, कर्जत तालुका यांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. कर्जतचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना निवेदन देवून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी कर्जत तालुक्यातील काही राजकीय व्यक्ती व प्रशासकीय कर्मचारी दबाव टाकत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर युवक क्रांती दलाचे राज्य संघटक अप्पा अनारसे, कर्जत तालुकाध्यक्ष प्रा. किरण जगताप, संघटक विनोद सोनवणे, सहसचिव ड. शरद होले, राशीन शहराध्यक्ष दादा राऊत, सचिन जगताप, अमर साळवे, अतुल राऊत, शुभम पानसरे, चेतन शेलार, महेश बेरगळ, ओंकार नामदास, सागर पठाडे, सागर पाटील, ओंकार कुलकर्णी आदींच्या सह्या आहेत. सुजित दामू नामदास, वय 20 व किशोर अशोक खरात, वय 23 या दोघा युवकांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे. नामदास यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, 10 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 10.30 वाजता भिगवण- बारामती रोडने बारामतीला जात असताना भिगवणच्या पुढे 2- 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकपोस्टवर दोन पोलीस थांबलेले होते. या पोलिसांनी दुचाकी थांबवली व ओळखपत्राची मागणी केली. त्यावेळी मोबाईलमधील आधारकार्ड दाखवत असताना पोलिसांनी गाडीची चावी काढून घेतली. त्यांनी नाव व जात विचारुन गलिच्छ भाषेत जातीवर शिव्या द्यायला सुरुवात केली व खाली पाडून गुडघा व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी व्हिडिओ काढण्यास चालू केल्यानंतर फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला व मारहाण केली. त्यावेळी पोलिसांच्या तोंडातून दारूचा वास येत होता व ते कोणाचेही काहीही ऐकुन घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांच्या वर्दीवरील बिल्ल्यावर शंकर निंबाळकर व जाविर अशी नावे दिसून आली. दरम्यान त्यांनी पोलीस चौकीमधील दोन वाहने बोलावून घेतली व रात्री 11 वाजेच्या सुमारास भिगवण पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. तेथे उपस्थित असलेले सहा ते आठ पोलीस कर्मचार्‍यांनी कोणतीही चौकशी न करता पट्टा व लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली व मोबाईल बळजबरीने काढून घेतले. मोबाईलमधील काही वैयक्तिक फोटो पाहत त्यावर अश्‍लील कमेंट केल्या व वैयक्तिक डाटा व व्हाट्सअप डिलीट केले. त्यात तीन ते चार वर्षांचा व्हाट्सअपवरील व्यवसायिक माहिती डिलीट झाली. झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास त्यांनी घेतलेले वैयक्तिक फोटो व्हायरल करू अशी धमकी दिली. रात्री 2 च्या सुमारास बळजबरीने कागदावर सह्या करायला लावल्या व गप्प घरी जा नाहीतर आणखीन मारहाण करू अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीसोबत पोलिसांनी केलेल्या मारण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेली डीव्हीडी देण्यात आली आहे.

COMMENTS