Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेहता कन्या विद्यालयात शालेय गणित विज्ञान प्रदर्शन उत्साहात

कोपरगाव ः कोपरगाव येथील डॉ. सी एम मेहता कन्या विद्यालयात नुकतेच शालेय गणित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींमध्ये वैज्ञान

शेवगावमध्ये 23 नोव्हेंबरला मनोज जरांगे यांची विराट सभा
निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी मराठा आरक्षणाला दिला पाठिंबा
गुहात आमदार अबू आझमींना गावकर्‍यांचा विरोध

कोपरगाव ः कोपरगाव येथील डॉ. सी एम मेहता कन्या विद्यालयात नुकतेच शालेय गणित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक, व्यवहारिक, पर्यावरण विषयक तसेच गणिताचे आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर आपल्या चिकित्सकवृत्तीचा उपयोग करून विज्ञान व गणिताची विविध उपकरणे तयार करण्याचा अनुभव त्यांना मिळावा व भविष्यात त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग त्यांना त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर व्यावहारिक जीवनामध्ये  व्हावा तसेच त्यामधून उद्याचे शास्त्रज्ञ तयार व्हावेत हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता.
जवळजवळ 400 उपकरणे विद्यार्थिनींनी या प्रदर्शनामध्ये मांडले होते. ही सर्व उपकरणे विद्यार्थिनींनी स्वतः बनविली होती. या प्रदर्शनाचे उदघाटन विद्यालयाच्या प्राचार्य प्रमोदिनी शेलार ,एस एस जी एम महाविद्यालयाचे ज्युनियर विभागाचे प्रा. संजय शिंदे, प्रा. सावकार हाडुळे, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे, पर्यवेक्षक सुरेश सोनवणे, मेहबूब शेख प्रदर्शनाच्या विभाग प्रमुख निंबाळकर मॅडम व सर्व गणित विज्ञान शिक्षक इतर सेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
                प्रा संजय शिंदे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना तुमच्यामध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण करा,भविष्यात वैज्ञानिक मोहिमेमध्ये तुमचा सहभाग असू द्या, त्यासाठी खूप अभ्यास करा असे मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या प्राचार्य प्रमोदिनी शेलार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना विज्ञान विषयक गीत गायले व विद्यार्थिनींनी विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण करावा व भारताला विज्ञानामध्ये एक सशक्त राष्ट्र बनवावे असे सांगितले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी किरण चांदगुडे, अरुण बोरनरे, प्रवीण बोराडे, प्रवीण निळकंठ, गांगुर्डे, अकलोड, निर्मख, साबळे, यमपल्ले, रनशूर, मुंडे, दिघे, भांड, सय्यद, निर्मळ, पायघन, द्वारके, भांगरे, चोपडा, मेहरखांब, गायकवाड, इत्यादींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चांदगुडे व आभार प्रवीण निळकंठ यांनी मानले.

COMMENTS