Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य यंत्रणेचे नियोजन

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे यांची भेट

नाशिक प्रतिनिधी - 15 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 23 या कालावधीत पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात अनेक राज्यातून लाखो भाविक सप्तशृंगी गडावर दर्श

’सीएचबी’ धारक प्राध्यापकांचे आंदोलन सुरुच
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ?
स्वामी माउली , भक्तांची साउली | LOKNews24

नाशिक प्रतिनिधी – 15 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 23 या कालावधीत पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात अनेक राज्यातून लाखो भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येतात त्यासाठी जिल्हा परिषद नाशिक मा मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांच्या आदेशाने डॉ सुधाकर मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या नियोजनातून गडावर येणाऱ्या भाविकांसाठी यात्रा कालावधीत विविध ठिकाणी रुग्णांना औषधोपचार करणे पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण व तपासणी करणे अति तात्काळ सेवा पुरवणीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या टीमने पाणी शुद्धीकरण केंद्र ट्रस्ट दवाखाना फेनिक्युलर ट्रॉली या विविध ठिकाणी पाच पथके द्वारे 37 वैद्यकीय अधिकारी सह 68 आरोग्य कर्मचारी व सहा रुग्णवाहिका वाहन चालकासह प्रतिनियुक्तीने नियुक्त्या करण्यात आलेले आहे सप्त गड ग्रामपंचायत सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट व्हेनिक्युलर ट्रॉली संस्था यांच्या समन्वय साधून गडावर आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे सदर भेटीदरम्यान डॉ राजेंद्र बागुल अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय बंगाळ तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती कळवण वैद्यकीय अधिकारी प्रा केंद्र नांदुरी व आरोग्य कर्मचारी समन्वय व समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून सदर भेटीदरम्यान जिल्हास्तरीय पर्यवेक्षक सुरेश जाधव तालुकास्तरीय पर्यवेक्षक टोकरे नाना देवरे नाना उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरीयेथे भेट देऊन यात्रेबाबत चूक बंदोबस्त करणे कामी मार्गदर्शन करण्यात आले 

COMMENTS