Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गृहखात्याचा मोठा निर्णय, मुंबईत ३ हजार कंत्राटी पोलीस भरती

मुंबई प्रतिनिधी - मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागानं हा निर्णय घेत

राज्यभरात आजपासून पोलिस भरती
कंत्राटी पोलिस भरतीवरून विरोधकांनी घेरले  
पोलिस भरतीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

मुंबई प्रतिनिधी – मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागानं हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटी रुपये खर्चासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. अधिक माहितीनुसार, मुंबई पोलीस दलामध्ये कंत्राटी भरती केली जाणार आहे. मनुष्यबळाची टंचाई असल्यानं तब्बल तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. त्यासाठी गृहखात्याकडून ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीनं भरती झालेल्या पोलिसांच्या पगारासाठी तब्बल ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सव झाला असला तरीही नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळामध्ये मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सुरक्षा महामंडळांच्या जवानांतून मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे. ११ महिने किंवा भरती होण्यापर्यंतचा कालावधी यातील जो कमी कलावधी असेल तेवढ्या काळापुरती ही भरती राहणार आहे. मुंबई पोलीस दलातील कंत्राट संपलं की, सुरक्षा महामंडळाचे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रूजू होतील

COMMENTS