Homeताज्या बातम्याविदेश

इस्त्रायलकडून हमासला चोख प्रत्युत्तर

तिसर्‍यांदा एअर स्ट्राईक ; 2200 ठिकाणे केली उद्ध्वस्त

जेरूसलम ः इस्त्रायल-हमास या दहशतवादी संघटनेमध्ये गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सुरू असून, या युद्धाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. इस्त्रा

विराजस कुलकर्णीचे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल
पिंपळदर येथे नवजात वासरावर बिबट्याचा हल्ला 
शेतमालावरील वायदे बाजार बंदी तातडीने हटवावी…स्वतंत्र भारत पक्षाचा सत्याग्रह इशारा

जेरूसलम ः इस्त्रायल-हमास या दहशतवादी संघटनेमध्ये गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सुरू असून, या युद्धाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. इस्त्रायलने या युद्धात आघाडी घेतली असून, इस्त्रायलने तिसर्‍यांदा एअर स्ट्राईक करत हमास या संघटनेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यात हमासच्या 2200 हून अधिक ठिकाणे उद्धवस्त केली आहेत.
इस्रायलने पुन्हा एकदा बॉम्बचा वर्षाव करत अनेक ठिकाणे उध्वस्त केली. यामध्ये हमासचे लष्करी प्रमुख मोहम्मद दायिफ यांच्या वडिलांचे घराचाही समावेश आहे. याशिवाय इस्रायलच्या हवाई दलाने हमासचे लष्करी प्रमुख मोहम्मद दायिफ यांच्या वडिलांचे घरही उद्धवस्त केले. डायफ हा इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे बोलले जात आहे. हमास आणि इस्रायल युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला, लहान मुले, तसेच वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. त्याचबरोबर हजारो लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय इस्त्रायली सैन्याने आपल्या भागात 1500 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तत्पुर्वी हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागले होते.याशिवाय हमासचे हजारो दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले होते. त्यांनी नि:शस्त्र इस्रायली लोकांवर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल हमासच्या स्थानांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. इस्रायलच्या सततच्या गोळीबारामुळे हमास हादरवून गेला आहे. आतापर्यंत हमासमधील शेकडो इमारती उध्वस्त झाल्या असून सर्वत्र केवळ ढिगारा आणि धूर दिसत आहे. त्यामुळे हमास आता बॅकफूटवर गेला असून, त्यांच्याकडून इस्त्रायलला युद्ध थांबवण्याची विनंती करण्यात येत आहे.

COMMENTS