श्रीगोंदा प्रतिनिधी ः श्रीगोंदा शहराची लोकसंख्या 2011 साली झालेल्या जणगणने नुसार 31 हजार होती.ती लोकसंख्या विचारात घेऊन नगरसेवकांची संख्या 19 ऐवज
श्रीगोंदा प्रतिनिधी ः श्रीगोंदा शहराची लोकसंख्या 2011 साली झालेल्या जणगणने नुसार 31 हजार होती.ती लोकसंख्या विचारात घेऊन नगरसेवकांची संख्या 19 ऐवजी 22 तर प्रभाग संख्या 9 ऐवजी 11 करण्यात आली असल्याचे राजपत्र काढण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी दिला. या राजपत्रानुसार 14 जागा सर्वसाधारण, अनुसूचित जाती 3 तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 5 जागा राखीव असणार आहेत.आरक्षित जागांपैकी अनुसूचित जाती तीन जागांपैकी 2 जागा महिला राखीव, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 5 जागा पैकी 3 जागा महिला राखीव,तर सर्व साधारण 14 जागा पैकी 6जागा महिला.अशा एकुण 22 पैकी 11जागा महिला साठी आरक्षित असणार आहेत. सध्या नगरपरिदेमधे 19 नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्षा असे 20 सदस्य कामकाज पाहत आहेत. नगरसेवक संख्या वाढल्याने निवडणुकीची तयारी करत असलेल्या अनेकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
COMMENTS