Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे काँगे्रसमध्ये पुन्हा गटबाजी चव्हाट्यावर

पुणे/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा, विधानसभा आाणि महापालिका निवडणुकांच्या लढाईसाठी काँग्रेसने नव्या दमाने रणांगणात उतरण्याची तयारी म्हणून आढावा बैठकां

बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू साठ्यावर कोतवाली पोलिसांची धाडसी कारवाई
आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .
वधू-वर मेळाव्यातून राज्यातील तेली समाज एकवटला

पुणे/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा, विधानसभा आाणि महापालिका निवडणुकांच्या लढाईसाठी काँग्रेसने नव्या दमाने रणांगणात उतरण्याची तयारी म्हणून आढावा बैठकांना आरंभ केला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय बैठका पुण्यात घेण्यात आल्या. मात्र, या बैठकांतून लढाईसाठी नवीन व्यूहरचना आखण्यावर चर्चा होण्यापेक्षा पक्षाअंतर्गत यादवीवर ऊहापोह करावा लागला.
‘कसब्या’चे आमदार रवींद्र धंगेकर यांचे छायाचित्र फलकांवर लावण्यास टाळल्याचे निमित्त घडले असून, त्यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तर ‘गटबाजी पुन्हा कानावर आली तर बघाच,’ असा दम द्यावा लागला आहे. त्यामुळे पक्षाअंतर्गत यादवी रोखणे आणि रुसवेफुगवे दूर करून मनोमीलन घडविण्याचे आव्हान काँग्रेसपुढे उभे राहिले आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पुण्यात काँग्रेस भवन येथे पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकांना माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, तसेच विश्‍वजीत कदम, प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, संजय जगताप ही दुसर्‍या फळीची नेतेमंडळीही उपस्थित होती. या बैठकांमध्ये आगामी निवडणुकांंना सामोरे कसे जायचे, यापेक्षा जास्त चर्चा ही पुणे शहरातील पक्षाअंतर्गत गटबाजीची रंगली. 

COMMENTS