Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानेश्वरीचे शब्द अमृता समान डॉ. गुट्टे महाराज ; सिद्धिविनायक मिशनतर्फे ज्ञानेश्वरी जयंती साजरी

नाशिकः  ज्ञानेश्वरीचे शब्द अमृता समान आहेत. मराठी मनावर ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांचा गाथा या दोन ग्रंथांनी आधी राज्य गाजवले आहे. एखादा ग्रंथ  सा

विदर्भाचा अनुशेष भरून काढू – मुख्यमंत्री शिंदे
जीएसटी महसूल डिसेंबरमध्ये 1.5 लाख कोटींवर
मुंबईत गोवर रुग्णांच्या संख्येत घट

नाशिकः  ज्ञानेश्वरीचे शब्द अमृता समान आहेत. मराठी मनावर ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांचा गाथा या दोन ग्रंथांनी आधी राज्य गाजवले आहे. एखादा ग्रंथ  सातशे बत्तीस वर्ष मनावर अधिराज्य गाजवत असेल तर त्या ग्रंथाची दिव्यता दिसून येत आहे. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका गीतेवरची टीका रचून मराठी माणसाला, सामान्य माणसाला गीतेचे तत्त्वज्ञान सोपे करून सांगितले असल्याचे विचार संत साहित्याचे अभ्यासक डॉ तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केले.  सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन तर्फे पंचवटीतील औदुंबर नगर दत्त मंदिर येथे ७३३  वी ज्ञानेश्वरी जयंती  साजरी करण्यात आली. 

त्याप्रसंगी डॉ. गुट्टे महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनील  केदार, पवन भगुरकर मिशनचे सचिव शाम पिंपरकर ,दत्त मंदिराचे पदाधिकारी  रमेश वानखेडे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. 

डॉ गुट्टे महाराज म्हणाले की, अभ्यासु,तत्त्वज्ञानी, तपस्वी, संशोधक या सर्वांनाच ज्ञानेश्वरीने गवसणी घातली आहे.  ईश्वरी ज्ञान ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथाचे नाव ज्ञानेश्वरी होय.रामायण, महाभारत या नंतर इतक्या वर्ष ज्ञानेश्वरीची महती अजून पर्यंत टिकून आहे. अभिजात साहित्य म्हणून ज्ञानेश्वरीकडे पाहिले जाते. ज्ञानेश्वरीच चिंतन मनाला सुख देते.सामान्यजनांना व उच्च तत्त्ववेत्यांना सुद्धा ज्ञानेश्वरी दिव्याप्रमाणे अखंडित प्रकाश देणारी आहे.ज्ञानदेवांचं हे अक्षर लेण मनाला ताजतवान करते. ज्ञान ,विज्ञान व आत्मज्ञान या सर्वांचा परिचय ज्ञानेश्वरीत होतो . ज्ञानेश्वरी ग्रंथात अनमोल असे मार्गदर्शन असून, भावी जीवन यशस्वीरित्या घालवायचे असेल तर ज्ञानेश्वरीचा आश्रय घ्या.महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण करणारे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत.

नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी! एक तरी ओवी अनुभवावी !! असे संत नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरी चे महत्व विशद केले आहे .संत सेना न्हावी, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज इत्यादी संतांनी ज्ञानेश्वरीचा गौरव केला आहे. यावेळी गुट्टे महाराज यांच्या हस्ते ज्ञानेशावरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. 

यावेळी मिशनचे जिल्हा समन्वयक गणपत हडपे, अभिमान हाडपे, औदुंबर नगर येथील दत्त मंदिराचे अध्यक्ष मोहनजी शहाणे, रमेश वानखेडे ,पगार काका, मुरलीधर आकोटकर  यांच्यासह साईनगर, गोपाल नगर ,औदुंबर नगर, गणेश नगर,अंबाजी नगर येथील भजनी मंडळ व ज्ञानेश्वरी महिला मंडळ यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

COMMENTS