राहुरी प्रतिनिधी ः आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी आज मुंबई येथे एसटीच्या उप महाव्यवस्थापिका स्थापत्य विद्या भिलारकार व वास्तू शास्त्रज्ञ निलेश वा

राहुरी प्रतिनिधी ः आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी आज मुंबई येथे एसटीच्या उप महाव्यवस्थापिका स्थापत्य विद्या भिलारकार व वास्तू शास्त्रज्ञ निलेश वाहिवाल ह्यांची भेट घेऊन बस स्थानक इमारतीच्या संदर्भात चर्चा केली. मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील ह्यांची मंत्रालयात भेट घेऊन 2022 मधील अतिवृष्टी सानुग्रह अनुदानाची रक्कम 13000 शेतकर्यांची तातडीने अदा करण्याबाबत निवेदन देऊन चर्चा केली. तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे ह्यांची मंत्रालयात भेट घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गट क व गट ड प्रवर्गातील प्रकल्पग्रस्ताच्या भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून तो पर्यंत संबंधित प्रवर्गाची भरती करू नये यासंह इतर कृषी विभागाच्या मागण्याबाबत चर्चा केली.
राहुरी शहरातील बस स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उप महाव्यवस्थापिका (स्थापत्य) सौ. विद्या भिलारकर व वास्तू शास्त्रज्ञ श्री. निलेश लहीवाल यांच्याशी चर्चा केली. बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे डिझाईन तयार झाले आहे. सुमारे पाच कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाची मान्यता अंतिम टप्प्यात आहे. उप महाव्यवस्थापिका सौ. विद्या भिलारकर यांनी माझ्या समक्ष संबंधित अधिकार्यांना जलद गतीने प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. पुढच्य आठवड्यात टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचे त्यांनी आश्वासित केले. अथक प्रयत्नाअंती लवकरच सुसज्ज अशा बस स्थानकाचे काम सुरू होईल अश् आशा आहे. माझ्या मतदारसंघातील शेतकर्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. अनिल पाटील साहेब यांची आज मंत्रालयात भेटी घेतली.सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील 39 हजार 184 शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत शेतकर्यांना सानुग्रह अनुदान तातडीने मंजूर करावी अशी मागणी यावेळी केली. आतापर्यंत 26 हजार 183 शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. पण अद्याप जवळपास 13 हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांची सानुग्रह अनुदानाची रक्कम तातडीने अदा करावी ही मागणी समस्त शेतकरी बांधवांच्यावतीने केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील गट क व गट ड प्रवर्गाच्या प्रकल्पग्रस्तांची विशेष भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तोपर्यंत संबंधित प्रवर्गाची भरती चालू करू नये, जेणेकरून स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळेल या मागणीसाठी कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे साहेबांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या प्रकल्पग्रस्तांसाठी विद्यापीठाच्या पदभरतीमध्ये 50 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावास शासनाने मंजूरी दिलेली असून येत्या आठ दिवसांमध्ये याबाबतचे आदेश निर्गमीत होणार आहेत. परंतू विद्यापीठाने त्यापूर्वीच सर्वसाधारण भरती प्रक्रिया सुरू केल्यास प्रकल्पग्रस्तांसाठी रिक्त जागा शिल्लक राहणार नाहीत. यासाठी सर्वसाधारण भरती प्रक्रिया काही कालावधीसाठी पुढे ढकलण्याची विनंती प्रकल्पग्रस्त कृति समितीने केली आहे. तसेच विद्यापीठाच्या अखत्यारीतील कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचार्यांना विद्यापीठातील इतर कर्मचार्यांप्रमाणे वेतन व अनुशंगिक लाभ मिळावेत या प्रलंबित मागणीसाठी बैठक आयोजित करण्याची मागणी मंत्री महोदयांना केली. लवकरच बैठक लावण्याचे त्यांनी मान्य केले.
COMMENTS