Homeताज्या बातम्यादेश

5 वर्षांची चिमुकली तब्बल २० मिनिट लिफ्टमध्ये अडकली

लखनऊ प्रतिनिधी - लखनऊच्या जनेश्वर एन्क्लेव्ह अपार्टमेंटमध्ये एक 5 वर्षांची मुलगी तब्बल 20 मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहे. लिफ्ट

ब्रह्माकुमारी संस्थेच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा  
प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला 825 उमेदवारांनी मारली दांडी

लखनऊ प्रतिनिधी – लखनऊच्या जनेश्वर एन्क्लेव्ह अपार्टमेंटमध्ये एक 5 वर्षांची मुलगी तब्बल 20 मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहे. लिफ्टमध्ये मुलगी ओरडत राहिली, तसेच मदतीची याचना करत राहिली. मुलीने अनेकवेळा दोन्ही हातांनी लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला. काही काळानंतर मुलीची अवस्था अतिशय बिकट झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बऱ्याच वेळानंतर मुलीला लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बबिता म्हणाल्या की, अपार्टमेंटमध्ये लाईटच्या खूप समस्या आहेत, त्यामुळे अशा घटना घडतात. यापूर्वीही अशीच लिफ्ट अडकली होती. आज ही मुलगी लिफ्टमध्ये अडकल्याने तिचे कुटुंबीय लिफ्टबाहेर प्रचंड अस्वस्थ झालेले दिसले. अपार्टमेंटच्या सुपरवायझरने सांगितले की, लाईट फेल झाल्याने मुलगी लिफ्टमध्ये अडकली होती. काही वेळाने मुलगी लिफ्टमधून बाहेर आली

COMMENTS