Homeताज्या बातम्यादेश

सिक्किममध्ये ढगफुटीमुळे पूर, लष्कराचे 23 जवान बेपत्ता

सिक्किम प्रतिनिधी - ढगफुटीमुळे गंभीर स्थिती निर्माण झालीय. सर्वत्र हाहाकार उडालाय. अचानक पूर आलाय. त्यात भारतीय सैन्याचे 23 जवान बेपत्ता आहे

इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी आडनाव गृहित धरणे चुकीचे : छगन भुजबळ
जिल्हा परिषदेच्या भरतीप्रक्रियेत उमेदवारांनी प्रलोभनास बळी पडू नये
महाराष्ट्रासह देशभरात ईडीने घेतली झाडाझडती

सिक्किम प्रतिनिधी – ढगफुटीमुळे गंभीर स्थिती निर्माण झालीय. सर्वत्र हाहाकार उडालाय. अचानक पूर आलाय. त्यात भारतीय सैन्याचे 23 जवान बेपत्ता आहेत. ढगफुटीमुळे तीस्ता नदीला पूर आलाय. सिंगतम भागात ढगफुटीची घटना घडली. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. आधी ढगफुटी झाली. त्यानंतर इतक पाणी वाढलं की, चुंगथांग धरणातून पाणी सोडावं लागलं. त्यामुळे अचानक पाण्याचा स्तर 15-20 ते फूटाने वाढला. सिक्किममध्ये हे सर्व घडलय. उत्तरी सिक्किममध्ये ल्होनक तळ्याच्यावर अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे लाचेन घाटीतील तीस्ता नदीला पूर आला, अशी माहिती गुवाहाटी डिफेन्सच्या प्रवक्त्याने दिली. घाटीतील काही सैन्य संस्थांवर याचा परिणाम झाला. 23 जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. शोधकार्य सुरु आहे. लोचन घाटीतून वाहणाऱ्या तीस्ता नदीला पूर आलाय. घाटीतील काही सैन्य ठिकाणी पुराच्या पाण्यात वाहून गेली. 23 जवानांशिवाय आणखी काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. तीस्ता नदीला आलेल्या पुरात मेल्लीमध्ये नॅशनल हायवे 10 वाहून गेला. अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती आहे. तीस्ता नदीला लागून असलेला भाग रिकामी करण्यात आला आहे. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पश्चिम बंगाल सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आहे. सिक्कीमच्या गँगटॉक येथून पर्यटकांची सुटका करण्यात येत आहे. हाय एल्टीट्यूड माऊंटनचा हा भाग आहे.

COMMENTS