Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडनंतर संभाजीनगरमध्ये मृत्यूचे तांडव

शासकीय रुग्णालयात 24 तासांत 18 मृत्यू

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी : नांदेडच्या सरकारी रुग्णालयात 48 तासात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील समाजमन सुन्न कर

धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या
आईकडून पोटच्या मुलीलाच जाळण्याचा प्रयत्न
कुणबी दाखल्यासाठी मागासवर्गीय आयोगाचा दौरा

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी : नांदेडच्या सरकारी रुग्णालयात 48 तासात 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील समाजमन सुन्न करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात मागील 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसात नांदेड व छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात मिळून 49 मृत्यू झाले आहेत. यामुळे सरकारी रुग्णालये मृत्यूचा सापळा बनत असल्याचे दिसून येत आहे. घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय घाटी रुग्णालयाला कायम औषधटंचाईला तोंड द्यावे लागते. सोमवारीही येथे केवळ 15 दिवस पुरेल इतकाच औषधसाठा होता. डीन घाटी रुग्णालयाचे डीन संजय राठोड यांनी सांगितले की, औषधाच्या तुटवड्याने किंवा डॉक्टरच्या असलेल्या रिक्त पदांमुळे, हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले नाहीत. बहुतेक मृत्यू झालेले रुग्ण बाहेरून रेफर केलेले होते किंवा मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते.
घाटी रुग्णालय हे छत्रपती संभाजीनगरमधील एक मोठे आणि महत्त्वाचे रुग्णालय आहे. केवळ मराठवाडाच नव्हे तर आसपासचे 12 ते 14 जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण या रुग्णालयावर अवलंबून आहेत. दररोज हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येत असतात. मात्र, घाटी रुग्णालयात मागच्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. दरम्यान, घाटी रुग्णालयात ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यांना इतर रुग्णालयांतून गंभीर अवस्थेत असताना दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, शासकीय रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त होत असून सामान्यांमधूनही संताप व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगरचे शासकीय रुग्णालय घाटीतही 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने हे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले आहे. डॉ. संजय राठोड म्हणाले, घाटीत ज्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला, ते सर्व रुग्ण घाटीत बाहेरून रेफर झालेले होते. त्यांच्यावर उपलब्ध सर्व उपचार करण्यात आले. औषध नसल्यामुळे कुठलाही मृत्यू झाला नाही. जागतिक मानकानुसार 1000 रुग्णांमध्ये 9 मृत्यू नॉर्मल असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 2000 रुग्णामागे 10 हे प्रमाण अतिशय कमी आहे. डॉ. संजय राठोड म्हणाले, घाटीत अत्यावश्यक औषधांचा पुरवठा महिनाभर पुरेल इतका आहे. त्यामुळे जे मृत्यू झाले आहेत त्यांची कारणे वेगळी आहेत. हृदय विकाराच्या झटक्याने तसेच किडनी फेल्यूअर आणि लिव्हर फेल्यूअर आणि रोड अपघातामुळे हे मृत्यू झाले असल्याचे डॉ. राठोड म्हणाले आहेत. 

COMMENTS