Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड घटनेत चौकशीअंती दोषींवर कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई ः नांदेडमध्ये मृतांची संख्या वाढत असून, मृतांचा आकडा 31 वर पोहचला आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 24 तासांमध्ये 10 रुग्णांचा

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध
आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत
’मित्रा’साठी सरकारी तिजोरीतून उधळपट्टी

मुंबई ः नांदेडमध्ये मृतांची संख्या वाढत असून, मृतांचा आकडा 31 वर पोहचला आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 24 तासांमध्ये 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली असून, सरकारने याप्रकरणी अहवाल मागवला आहे. तर दुसरीकडे नांदेडच्या घटनेवरून राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जी घटना घडली आहे. ती सरकारने अतिशय गांभीर्याने घेतली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि संबंधित सचिव व अधिकारी प्रत्यक्षघटनास्थळी गेलेले आहेत. त्यामुळे चौकशीअंती दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या घटनेसंदर्भात प्राथमिक माहिती घेतली असता रुग्णालयात 127 प्रकारच्या औषधांचा साठा होता. विशेष म्हणजे त्याउलट त्या रुग्णालयात नवीन औषधी खरेदीसाठी 12 कोटी रुपयांचा निधीला देखील मान्यता दिलेली होती. परंतू रुग्णांच्या मृत्यूची घटना अतिशय गंभीर आहे. दुर्दैवी आहे. झालेल्या संपूर्ण घटनेला सरकारने गांभीर्याने घेतले आहे. वैद्यकीय मंत्री व अधिकारी प्रत्यक्षघटनास्थळी जाऊन तपासणी करत आहेत. चौकशीअंती या प्रकरणात कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर जोरदार कारवाई केली जाईल. असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. याचबरोबर नांदेडसह छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंची दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे. रुग्णांच्या मृत्यूबाबत रुग्णालय प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. तसेच, राज्यातील शासकीय रुग्णालयांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्‍वासनही डॉ. पवार यांनी दिले आहे.

सखोल चौकशीचे आदेश : वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ- नांदेडमधील 24 तासात 24 रुग्णांच्या मृत्यूची सखोल चौकशी करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ही घटना धक्कादायक असून याची सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती दिली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

खासदाराने डीनकडून साफ करुन घेतले शौचालय- नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यू झाल्यामुळे अवघ्या राज्यात खळबळ माजली असून, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून (डीन) चक्क शौचालय साफ करवून घेतल्याची बाब उजेडात आली आहे. पाटील यांनी या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत रुग्णालयातील दुरवस्था चव्हाट्यावर आणली आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांना तिथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसेल. हे पाहून हेमंत पाटील हे चांगलेच संतापले. त्यांनी चक्क रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना (डीन) शौचालय साफ करायला लावले. इतकेच नाही तर त्यांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत अधिष्ठात्यांकडून शौचालय साफ करवून घेतल्याची घटना घडली आहे.

COMMENTS