Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संस्काराशी निगडित रांगोळी हे पवित्रतेचे प्रतीक ः अपर जिल्हाधिकारी कोळेकर

कोपरगाव प्रतिनिधी ः संस्काराचे निगडित रांगोळी हे समाजाचे अन् पवित्र पणाचे प्रतिक असून रांगोळीने मन आणि परिसर पवित्र होवून जाते.सूर्यतेजने घर तेथे

शाळा कॉलेजच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे
राजूर प्रकल्पातील 22 आश्रम शाळांचा शंभर टक्के निकाल
राहुरीत पोलिस पाटील, मंगल कार्यालय मालकांची बैठक उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ः संस्काराचे निगडित रांगोळी हे समाजाचे अन् पवित्र पणाचे प्रतिक असून रांगोळीने मन आणि परिसर पवित्र होवून जाते.सूर्यतेजने घर तेथे रांगोळी स्पर्धेसह विविध उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार शिर्डीचे पहिले अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सूर्यतेज संस्था कोपरगांव वतीने कोपरगांव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा निमित्ताने घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्र राज्यात नावाजलेल्या या स्पर्धेचा उपक्रम 10 वर्षापासून सुरू आहे. कृष्णाई बँक्वेट हॉल येथे सन 2022 स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी वनपाल सुनिता यादव, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, सूर्यतेज सल्लागार अ‍ॅड. स्मिता जोशी, डॉ. निलीमा आव्हाड, मसुदा दारूवाला,पुनम अमृतकर,वास्तुरचनाकार प्राजक्ता राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला विसपुते सराफ, राष्ट्रीय आयुर्वेद गुरू डॉ. रामदास आव्हाड, अग्रवाल चहा कंपनी, पुष्पांजली शॉपी, कापसे पैठणी, सुशांत आर्ट्स अ‍ॅन्ड पब्लिसिटी, पांडे स्विटस् यांचे विशेष सहकार्य लाभले. तर पारंपरिक, निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र, सामाजिक विषय, व्यंगचित्र या पाच कलाप्रकारात आयोजित केलेल्या स्पर्धेत 325 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यातील प्रथम क्रमांकास कापसे पैठणी, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र तर गुणवत्ता रांगोळीस पुष्पांजली भेट वस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.  कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व नोंदणी अधिकारी तसेच परिक्षण समिती प्रमुख कल्पना गिते,ऐश्‍वर्या बिडवे,शिवानी गवळी,अनिल अमृतकर, अनंत गोडसे, महेश थोरात, स्नेहल पगारे, वासंती गोंजारे,भाग्यश्री जोशी, अमोल शिंपी आदि सह सूर्यतेज संस्थेचे सदस्य आणि दीपावली- पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचलन राधिका तोरणे यांनी केले तर सामुदायिक वंदेमातरम् गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

COMMENTS