Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे हेळसांड झाल्याने जखमी मोराचा मृत्यू

मोराला रस्त्याने फरफटत नेले..! पक्षीप्रेमी असल्याचा आव आणणारे आता कुठे गेले..?शिराळा / प्रतिनिधी : अत्यवस्थ मोराला दोघे दुचाकीवरून नेत होते. टॉ

माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
शेडगेवाडी-मुंबई सेंट्रल एसटी बस सेवा सुरु; शिराळा तालुका प्रवासी संघाच्या पाठपुराव्यास यश
विमानांच्या आवाजाने बंकरमध्ये जीव मुठीत : सौरभ जाधव याचा थरारक अनुभव

मोराला रस्त्याने फरफटत नेले..! पक्षीप्रेमी असल्याचा आव आणणारे आता कुठे गेले..?
शिराळा / प्रतिनिधी : अत्यवस्थ मोराला दोघे दुचाकीवरून नेत होते. टॉवेलने गुंडाळलेल्या अवस्थेतील त्या मोराचा पिसारा रस्त्याला घासत होता. त्या दोघांच्या ताब्यातून सुटण्यासाठी मोराची असह्य अशी धडपड सुरू होती. त्यांना त्याही अवस्थेत सुटकेसाठी मोर टोच्या मारत होता. बघ्यांपैकी एकाने ही सारी कसरत मोबाईल कॅमेर्‍यात चित्रीत करून सोशल मिडियाच्या माध्यमांतून व्हायरल झाले. मोर घेवून जाणारे ’ते’ दोघे कोण आहेत याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर ते दोघे वनविभागाचे कर्मचारी असून सरकारी वाहन नसल्याने मोराला तातडीने उपचार मिळावेत यासाठी धडपड करीत असल्याचे स्पष्ट झाले. या कसरती मागचे कारण इतकेच की म्हणे वनविभागाकडे मोराला नेण्यासाठी वाहतुकीची गाडीच नव्हती. राष्ट्रीय पक्षी मोराला उपचारासाठी वाहन मिळू नये ही वन विभागाची दयनिय अवस्था. मात्र या निमित्ताने वनविभागाच्या कारभाराचे पुरते धिंडवडे काढत नेटकर्‍यांनी जगभर व्हायरल केले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कुपवाड येथील पाटील मळ्यात एक मोर अत्यवस्थ असल्याची वार्ता वनविभागाला समजली. वनविभागाचे दोन कर्मचारी तत्काळ जागेवर पोहचले. शुध्द हरपलेल्या अवस्थेतील मोराला त्या दोघांनी तत्काळ टॉवेलमध्ये गुंडाळत उपाचारासाठी म्हणून कुपवाडमधील वनविभागाच्या कार्यालयाकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तत्काळ वाहन उपलब्ध नसल्याने दचाकीवरूनत्यांनी मोराला मांडीवर घेत कूच केले.
दरम्यान, दुचाकीवरून घेऊन जाताना मोराचा भला मोठा पिसारा रस्त्यावरून घासत जात होता. त्याचवेळी मोर सुटकेची धडपडही करत होता. मागे बसलेल्या कर्मचार्‍याला तो टोच्याही मारत होता. मोराची होत असलेली ही हेळसांड काहींनी कॅमेर्‍यात टिपली आणि व्हायरल केली. आज सुट्टीमुळे बहुतेक वरिष्ठ कर्मचारी बाहेर गावी होते. वनविभागाचा या भोंगळ कारभाराचे समाज माध्यमावरून धिंडवडे निघाले. काहींना ही मोराची तस्करी वाटली.


बेशुध्द असल्याने तातडीने उपचार मिळावेत यासाठी कर्मचारी त्या ठिकाणी गेले होते. मोटार चालक उपलब्ध नसल्याने त्यांनी दुचाकीवरून त्या मोराला वनविभागाच्या कार्यालयात आणला आहे. तो शिकारीचा नव्हे तर तातडीने मदतीचा त्यांचा हेतू होता.
डॉ. अजित साजणे, उपवनसंरक्षक सांगली


वन विभागाकडून अशी राष्ट्रीय पक्ष्याची अशी हेळसांड होत असेल तर नागरीकांनी काय आदर्श घ्यावा? वन्यजीवांची हाताळणी कशी केली पाहिजे. याचे सामान्य ज्ञान कर्मचार्‍यांना दिसत नाही. वनविभागाचे अधिकृत वाहन नसेल तर रिक्षा किंवा टेम्पो सारखे खासगी वाहन उपलब्ध नव्हते का? अधिकृत वाहन का नाही याबद्दल अधिकार्‍यांनी खुलासा करावा. संबंधित कर्मचार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे. मी स्वतः याबाबत लेखी तक्रार नोंदवणार आहे.
कौस्तुभ पोळ (अ‍ॅनिमल राहत, सांगली)

COMMENTS