भूक लागल्यानंतर आपण अन्नपदार्थ खात असतो. परंतू एका चाळीस वर्षांच्या इसमाने आपल्या पोटाला भंगाराचे गोदाम समजून वाटेल ती वस्तू खाल्ली. अखेर पोटात द
भूक लागल्यानंतर आपण अन्नपदार्थ खात असतो. परंतू एका चाळीस वर्षांच्या इसमाने आपल्या पोटाला भंगाराचे गोदाम समजून वाटेल ती वस्तू खाल्ली. अखेर पोटात दुखत आहे म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा त्याचे ऑपरेशन करण्यात आले ते डॉक्टरांनाच धक्का बसला. त्याच्या पोटातून स्क्रु, बोल्ट, इअरफोन, लॉकेट अशा एकापेक्षा एक धोकादायक वस्तू निघाल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले. या इसमाच्या ऑपरेशनला तीन तास लागले. या इसमाच्या जीवाचा धोका अद्याप टळलेला नसून त्याला व्हेंटीलेटरवर ठेवले आहे. कुलदीप सिंग याला येथील मोगा मेडीसिटी स्पेशिलीटी रुग्णालयात आणले तेव्हा त्याला हाय फिव्हर, उलट्या आणि पोटात दुखत होते. डॉक्टरांनी सांगितले की त्याला दोन ते तीन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास सुरुच होता. डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्सरे काढला तेव्हा त्याच्या पोटात लॉकेट, चेन, नट, बोल्ट, इअरफोन आणि अनेक सटरफटर वस्तू आढळल्या. त्यानंतर कुलदीप याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतल्याचे रुग्णालयाचे संचालक अजमेर सिंग कार्ला यांनी सांगितले.
सर्जन अनुप हांडा आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ.विश्वनूर कार्ला यांनी कुलदीप याच्यावर ऑपरेशन केले. या रुग्णाला पीका डीसओर्डर हा आजार आहे. पीका डीसऑर्डर हा खाण्यासंबंधीचा आजार आहे ही व्यक्ती अन्नपदार्थांऐवजी भलत्याच वस्तू गिळत असते. रुग्णाने अनेक धारदार वस्तू खाल्ल्याने त्याच्या आतड्याला अनेक जखमा झाल्या होत्या. कुलदीप याची ऑपरेशन जरी यशस्वी झाले असले तरी त्याची तब्येत अजूनही क्रीटीकल आहे. त्याला व्हेंटीलेटरवर ठेवले असल्याचे अजमेकर सिंग यांनी सांगितले.
COMMENTS