झारखंड प्रतिनिधी - झारखंडमधील पाकुड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडमधील पाकुडमधील एका खासगी शाळेत मध्यान्ह भोजन म्हणून विद्या
झारखंड प्रतिनिधी – झारखंडमधील पाकुड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडमधील पाकुडमधील एका खासगी शाळेत मध्यान्ह भोजन म्हणून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नपदार्थांमध्ये मेलेली पाल आढळून आली आहे. हे अन्न खाऊन 100 हून अधिक विद्यार्थ्यांना मळमळू लागलं आहे. या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकुड जिल्ह्यामधील पाकुडिया प्रांतामधील एका खासगी शाळेमध्ये नेहमीप्रमाणे वाटप करण्यात आलेल्या खाद्यपदार्थामध्ये मेलेली पाल आढळून आली. हा पदार्थ तयार करतानाच त्यामध्ये पाल पडल्याची माहिती समोर आली. मात्र ही गोष्ट कोणाच्याही लाक्षात आली नाही. हेच अन्न विद्यार्थ्यांना वाढण्यात आलं. विद्यार्थ्यांनी हा पदार्थ सेवन केल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. उलट्या, मळमळणे आणि पोटदुखीसारखा त्रास जाणवू लागल्याने 100 हून अधिक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.
अनेकदा मध्यान्ह भोजनामध्ये पाल किंवा झुरळं किंवा किटक पडल्याच्या बातम्या समोर येतात. मात्र अशाप्रकरणांमध्ये कोणावरही कठोर कारवाई होताना दिसत नाही. अनेकदा सरकारी शाळांमध्ये देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे प्रकार वरचेवर ऐकायला आणि वाचायला मिळतात. मात्र झारखंडमधील खासगी शाळेमध्ये हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली. शाळा प्रशासनाने आपल्या स्तरावर या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे
COMMENTS