Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितचा काँगे्रसला 7 दिवसांचा अल्टीमेटम

अन्यथा 48 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये येण्यास इच्छूक असली तरी, इंडिया आघाडीकडून कोणतेही पुढील पाऊले न उचल

मविआ-वंचितची बोलणी फिस्कटली ?
ओबीसींना फसवण्यासाठीच जरांगे-फडणवीसांचे भांडण
‘वंचित’ लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढणार

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये येण्यास इच्छूक असली तरी, इंडिया आघाडीकडून कोणतेही पुढील पाऊले न उचलण्यात आल्याचे वंचितचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँगे्रसने आपली भूमिका 7 दिवसांमध्ये जाहीर करावी अन्यथा वंचित आघाडी 48 मतदारसंघात आपले उमेदवार उभे करतील असा इशारा दिला आहे.

मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्सची तिसरी बैठक मुंबईमध्ये होणार आहे. या आघाडीत भाजपविरोधी पक्षांचा समावेश असून या बैठकीत देखील भाजपविरोधी पक्षांना आमंत्रण देण्यात आले असले तरी वंचित बहुजन आघाडी पक्षाला मात्र या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलेले नाही, वंचितला इंडिया आघाडीत जायचे आहे. परंतु काँग्रेसकडून निमंत्रण मिळत नसल्याचे आंबडेकर यांनी सांगितले. याउलट आंबेडकर यांनी आमंत्रण स्वीकारले नसल्याची चर्चा होत आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून थेट प्रश्‍न विचारला. पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांना महाविकास आघाडीविषयी प्रश्‍न करण्यात आला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केलेत. महाविकास आघाडीत चर्चाच होत नाही. बैठकीची तारीख ठरत नाही. महाविकास आघाडीच्या पक्षात जागावाटप ठरलेले नाही. त्यानंतर सेना आणि वंचित यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा होईल. वंचितने आघाडीत सामील व्हावे, असे म्हटल जाते. परंतु काँग्रेसकडून काहीच उत्तर मिळत नसल्याचा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला आहे. इंडिया आघाडीत आम्हाला सहभागी व्हायचे आहे. त्यासाठीच्या अटीसह आम्हाला त्याबद्दल चर्चा करायची आहे. पण त्यावर त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. दरम्यान याप्रकरणी वंचितकडून 1 सप्टेंबर 2023 रोजी आम्ही मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहण्यात आले होते, त्यावर अजून त्यांचे उत्तर आलेले नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता प्रियदर्शी तेलंग यांनी हे पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी काँग्रेसने आघाडीसाठी नकार दिल्याची खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली. जर इंडिया भाजप-आरएसएसच्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यासाठी खरोखर गंभीर असेल. तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. त्यात आघाडीत आम्हाला सामावून घ्यावे अशी इच्छादेखील त्यांनी बोलून दाखवली. आघाडीच्या चर्चेसाठी आमचे दरवाजे अजूनही उघडे असल्याचे वंचित बहुजनकडून सांगण्यात आले आहे.  वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघडीत जायचे आहे, परंतु काँग्रेसकडून कोणताच प्रतिसाद दिला जात नाही. प्रियदर्शीं तेलंग यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अ‍ॅड. आंबेडकर हे इंडिया आघाडीचे आमंत्रण स्वीकारत नाहीत असा अपप्रचार सुरू आहे. परंतु काँग्रेसकडून वंचितला कोणतेच आमंत्रण देण्यात आले नसल्याचे तेलंग म्हणाले आहेत. वंचितला लोकसभा निवडणूक, 2019 आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, 2019 मध्ये अनुक्रमे 6.98 आणि 5.57 टक्के मते मिळवली तरीही त्यांना इंडिया आघाडीत स्थान देण्यात आलेले नाही.

लोकसभेच्या सर्व जागा लढवण्याची तयारी – गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचितमुळे महाविकास आघाडीच्या जागा कमी झाल्याचा डांगोरा पिटला जात होता, आता मात्र आम्ही आघाडीमध्ये जाण्यास इच्छूक असतांना, आम्हाला दूर लोटले जात आहे. त्यामुळे आम्ही 48 जागांच्या दृष्टीने कामाला लागलो आहोत. लोकसभेच्या निवडणुका कधीही लागतील, अशी परिस्थिती आहे. परंतु जागांची वाटाघाटी झाली नसल्याने आमच्या सभा आता सुरू होणार असल्याचे आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे हा एकप्रकारे इंडिया आघाडीला इशाराच मानला जात आहे.

COMMENTS