वाराणसी प्रतिनिधी - वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रुद्राक्ष के
वाराणसी प्रतिनिधी – वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रुद्राक्ष केंद्रावरून विमानतळाकडे रवाना झाले. त्यावेळी एका तरुणाने त्यांच्या ताफ्यासमोर उडी मारली ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीपासून अवघ्या 10 फूट अंतरावर घडली. हे पाहताच पोलीसांनी धावत जाऊन तरुणाला पकडले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा गाझीपूर जिल्ह्यात राहणारा भाजपचा कार्यकर्ता आहे. भारतीय लष्करात नोकरीच्या मागणीबाबत त्याला पंतप्रधानांची भेट घ्यायची होती. याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र झडतीदरम्यान एसपीजीला तरुणाकडे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यक्रमाचे ओळखपत्र सापडले.
पीएम मोदींच्या सुरक्षेत चूक होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी जवळपास 9 वेळा त्यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या आहेत. 30 एप्रिल रोजी कर्नाटकातील म्हैसूरमध्ये रोड शो दरम्यान पीएम मोदींच्या दिशेने मोबाईल फेकण्यात आला होता. यापूर्वी १९ जानेवारीला मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील व्हीव्हीआयपी परिसरात ३८ वर्षीय व्यक्ती घुसली होती. फिरोजपूरमध्ये पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटांसाठी फ्लायओव्हरवर थांबला होता. शेतकऱ्यांनी पुढे रास्ता रोको केला होता.
COMMENTS